डिटेक्टिव्ह ब्योमकेक्ष बक्षीची सिक्वल लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 15:42 IST
चित्रपट हिट झाला की, त्या चित्रपटाचा सिक्वल बनवला जाणार यात काही नवीन नाहीये. सुशांत सिंग रजपूत डिटेक्टिव्ह ब्योमकेक्ष बक्षी या ...
डिटेक्टिव्ह ब्योमकेक्ष बक्षीची सिक्वल लवकरच
चित्रपट हिट झाला की, त्या चित्रपटाचा सिक्वल बनवला जाणार यात काही नवीन नाहीये. सुशांत सिंग रजपूत डिटेक्टिव्ह ब्योमकेक्ष बक्षी या चित्रपटात एका वेगळ्या रूपात पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील त्याचे कामही प्रेक्षकांना खूप आवडले होते. या चित्रपटाचा लवकरच सिक्वल बनवला जाणार असल्याचे सुशांत सिंग रजपूतने म्हटले आहे. सुशांतने नुकताच त्याच्या फॅन्ससोबत ट्विटरवरून संवाद साधला होता. त्यावेळी त्याच्या एका फॅनने डिटेक्टिव्ह ब्योमकेक्ष बक्षी या चित्रपटाचा सिक्वल बनवला जाणार आहे का असे विचारले होते. त्यावर सुशांतने हो असे उत्तर दिल्याने या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे.