Join us  

​SEE PICS : सनी लिओनीचा पती डेनियल वेबरचा जुळ्या मुलांसोबतचा फोटो तुम्ही बघितला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 11:31 AM

अभिनेत्री सनी लिओनीचा पती डेनियल वेबर आपल्या तिन्ही मुलांची जीवापाड काळजी घेतो. अनेकदा तो आपल्या मुलांसोबत दिसला आहे. कधी ...

अभिनेत्री सनी लिओनीचा पती डेनियल वेबर आपल्या तिन्ही मुलांची जीवापाड काळजी घेतो. अनेकदा तो आपल्या मुलांसोबत दिसला आहे. कधी त्यांच्यासोबत खेळताना, कधी त्यांना फिरवतांना. आता डेनियलने आपल्या जुळ्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कमालीचा सुंदर आहे, यात शंका नाही. यात शर्टलेस डेनियलने आपल्या दोन्ही मुलांना दोन्ही बाजूंनी कवटाळले आहे. डेनियलयची दोन्ही अर्थात अशर व नोआ यात अतिशय क्यूट दिसत आहेत.सनी लिओनी आणि डेनियल यांनी यावर्षी मार्चमध्ये सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यापूर्वी सनीने निशा कौर वेबर हिला दत्तक घेतले आहे. दत्तक घेतेवेळी निशा केवळ २१ महिन्यांची होती. त्यामुळे सनी व डेनियलला आता एकूण तीन मुले आहेत, निशा, नोआ आणि अशर.निशाला आधी ११ जोडप्यांनी दत्तक घेण्यास नकार दिला होता. कारण दत्तक घेण्यापूर्वी मुलाचे रंग, रूप, मुलीची वैद्यकिय स्थिती असे सगळे पालक बघतात. पण सनीने मात्र निशाला बघितले आणि बघताचं क्षणी तिने तिला होकार दिला. काही दिवसांपूर्वी सनी आपल्या जुळ्या मुलांसोबत आई-वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी गंगा घाटावर गेली होती.लग्नाअगोदर डेनियल आणि सनीने एकमेकांना बरेच वर्ष डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा सनी डेनियलला एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये भेटली होती. ज्यामध्ये डेनियलने सनीला इम्प्रेस करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु सनीने डेनियलला अजिबात भाव दिला नाही. तिच्यासाठी डेनियल केवळ एक केसोनोवा होता. ALSO READ :  मदर्स डेच्या अगोदरच आपल्या मुलांबद्दल सनी लिओनीने केला ‘हा’ खुलासा!हे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सनीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आतापर्यंत जेवढे हॉट सीन दिले आहेत, ते सर्व पती डेनियलसोबत दिले आहेत. डेनियल अशाप्रकारचे सीन देण्यासाठी चित्रपटात बॉडी डबलचे काम करतो. डेनियल एखाद्या ड्रीम पतीप्रमाणे सनीला आपल्या हाताने जेवण बनवून भरवीत असतो. सनी लिओन आणि डेनियल वेबर केवळ चांगले लाइफ पार्टनर नाहीत तर चांगले बिझनेस पार्टनरही आहेत. सनीने पती डेनियलसोबत २००९ मध्ये सनलस्ट पिक्चर्स नावाचे एक प्रॉडक्शन हाउस सुरू केले आहे. सनीला डेनियलसोबत वेळ व्यतीत करायला खूप आवडते. त्यामुळे ती त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवू इच्छिते. जेव्हा-जेव्हा तिला कामातून वेळ मिळतो तेव्हा ती डेनियलसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करते.