Join us  

SEE PICS : रणबीर कपूर-आलिया भट्ट पुन्हा दिसले सोबत, संजय दत्तच्या घरी पोहोचले एकत्र!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 6:12 AM

तिकडे  भारताबाहेर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे प्रेम बहरते आहे आणि इकडे भारतात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ...

तिकडे  भारताबाहेर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे प्रेम बहरते आहे आणि इकडे भारतात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या प्रेमाला उधाण आले आहे. होय, रणबीर व आलिया दोघांच्या अफेअरच्या बातम्या सध्या जोरात आहेत. केवळ अफेअरचं नाही तर हे कपल २०२० मध्ये लग्न करणार, अशीही माहिती निकटच्या गोटातून मिळाली आहे. आता तर रणबीर व आलियाचे एकमेकांशिवाय पान हलत नाही, अशी स्थिती आहे. दोघेही अनेक प्रसंगी एकत्र दिसत आहे. अगदी अलीकडे आलिया रणबीरच्या फॅमिलीसोबत डिनर एन्जॉय करताना दिसली होती. यानंतर काल बुधवारी ती पुन्हा रणबीरसोबत संजय दत्तच्या घरी दिसली.होय, आलिया व रणबीर संजयच्या घरातून बाहेर येत असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या फोटोंमध्ये आलिया व रणबीर दोघांच्याही चेह-यावरचा आनंद लपता लपत नाहीये. दोघेही एकमेकांची कंपनी किती एन्जॉय करताहेत, हेच यावरून दिसतेयं.रणबीर कपूरच्या ‘संजू’ हा आगामी चित्रपट येत्या २९ जूनला रिलीज होतो आहे. हा चित्रपट संजयच्या आयुष्यावर बेतलेला आहे, हे आपण जाणतोच. याच पार्श्वभूमीवर रणबीरने संजयची भेट घेतली. आलिया सोबत न्यायलाही तो विसरला नाही. ALSO READ :  रणबीर कपूरने जाहीरपणे विचारला प्रश्न, ‘विल यू मॅरी मी?’संजय दत्तच्या घरून निघाल्यानंतर आलिया रणबीर कपूरच्या घरी गेली  , अशीही चर्चा आहे. खास रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांना भेटायला ती रणबीरच्या घरी गेली होती़, असे कळते. एकंदर काय तर, हे सीक्रेट कपल आपल्या रिलेशनशिपवर बोलायला तयार नाही. पण न बोलताचं त्याचा एकमेकांसोबतचा वावर बरेच काही सांगणारा आहे. तूर्तास आलिया व रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहेत. या चित्रपटाचे शूट सुरु झाले आणि दोघांच्याही रिलेशनशिपच्या बातम्या सुरू झाल्या. अर्थात या बातम्यांना आलिया व रणबीर दोघांनीही हवा दिली. अलीकडे दोघेही कधी नव्हे इतके एकत्र दिसू लागले आहे. सोनम कपूरच्या लग्नात एकत्र एन्ट्री करण्यापासून तर फॅमिलीसोबत एकत्र डिनर डेट करण्यापर्यंतचे दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.