see pics : तैमूरला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला निघाली मॉम करिना कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 09:39 IST
तैमूरच्या जन्मानंतर घरात बसून न राहता करिना कपूर लगेच कामाला लागली. अनेक अवार्ड फंक्शन, अनेक पार्ट्या, डिनर डेट अशा ...
see pics : तैमूरला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला निघाली मॉम करिना कपूर!
तैमूरच्या जन्मानंतर घरात बसून न राहता करिना कपूर लगेच कामाला लागली. अनेक अवार्ड फंक्शन, अनेक पार्ट्या, डिनर डेट अशा सगळ्या इव्हेंटलाही ती दिसली. पण यापूर्वी या सगळ्या इव्हेंटमध्ये एक तर ती एकटी होती किंवा तिच्यासोबत सैफ अली खान होता. पण तैमूर? तैमूरला आत्तापर्यंत करिनाने बाहेर काढले नव्हते. पण काल गुरुवारी करिना तैमूरला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला निघाली. करिनासोबत तिची लाडकी बहीण करिश्मा कपूर ही देखील होती. करिनाच्या गाडीत आणखी एक महिला बसलेली होती आणि तिच्या कडेवर चिमुकला तैमूर मस्तपैकी पहुडलेला होता. तैमूरचा चेहरा मीडियाच्या कॅमेºयात कैद झाला नाही. पण तैमूरची एक झलक मात्र फोटोग्राफर्सना पाहता आली. त्याचेच काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तैमूरच्या चेहºयाचा काहिसा भाग दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी करिना आणि सैफच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर तैमूरचा फोटो असा व्हायरल होणे, करिनाला काही आवडले नव्हते. कारण तैमूरला कुणाची तरी दृष्ट लागेल, असे तिचे मत होते. खुद्द सैफ अली खान याने एका मुलाखतीत करिना तैमूरबद्दल किती प्रोटेक्टिव्ह आहे, हे सांगितले होते. पण शेवटी आईच ती. आपल्या मुलाला सगळ्या दृष्ट प्रवृत्तीपासून दूर ठेवण्यासाठीच कुठलीही आई धडपडत असते. आपल्या बाळाला साधे खरचटले तरी तिचा जीव तडफडतो. करिनाही याला अपवाद नाही. एकंदर काय तर करिनाने आधी प्रेग्नंसी एन्जॉय केली. आता ती मातृत्व एन्जॉय करतेय. लाडक्या तैमूरच्या पालनपोषणात कुठलीही कसर राहायला नको, हाच तिचा प्रयत्न आहे.