Join us  

पहा मामा सलमान खानची भाचा आहिलने कशी घेतली फिरकी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 2:45 PM

सध्या मामा-भाच्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भाचा आहिल मामा सलमानची फिरकी घेताना दिसत आहे.

जगात असे काही नाते आहेत, ज्याच्यासमोर कितीही मोठा व्यक्ती असली तरी तो असाह्य होतो. यामधीलच मामा-भाच्याचे एक नाते आहे. आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत, हे कदाचित तुमच्या लक्षात आलेच असेलच. होय, अगदी बरोबर. आम्ही बॉलिवूडमधील मामा-भाच्याची सुपरहिट जोडी सलमान खान आणि आहिल शर्मा यांच्याविषयी बोलत आहोत. सध्या या मामा भाच्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून, त्याला सलमानच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. व्हिडीओमध्ये चिमुकला भाचा आहिल आपल्या मामाची फिरकी घेताना दिसत आहे. वास्तविक गेल्या काहीकाळापासून खान परिवार मामा भाच्याचे फोटोज् नियमितपणे सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत. आज जो सलमानने व्हिडीओ पोस्ट केला आहे, तो बघून तुमच्या तोंडून ‘सो क्यूट’ असे शब्द बाहेर पडल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडीओ सकाळच्या नास्त्याच्या टेबलवर शूट करण्यात आला आहे. टेबलवर सलमान आणि त्याचा भाचा नास्ता करताना दिसतात. परंतु यादरम्यान अशी काही गंमत होते की, दोघांच्या चेहºयावर हास्य फुलते. वास्तविक यावेळी सलमानचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. जेव्हा सर्व लोक नास्ता करीत होते, तेव्हा सलमानच्या डोक्यात आहिलशी मस्ती करावीशी वाटली. त्याने आहिलच्या हाताने घास भरविण्याची त्याच्याकडे मागणी केली. मात्र आहिल मामापेक्षा कमी असेल असे अजिबातच नाही. त्यानेही मामाला त्याच्याच खोडकर अंदाजात काहीसा घास भरविण्याचा प्रयत्न केला. सलमानने आहिलच्या हातून घास खाण्यासाठी त्याच्याकडे तोंड केले, तोच आहिलने आपला हात आखडता घेत तो घास स्वत: खाल्ला. आहिलचा हा खोडकर अंदाज बघून सलमानच्या चेहºयांवर हास्य फुलणार नाही तरच नवल. नास्त्याच्या टेबलवर बसलेल्या सर्वच सदस्यांच्या चेहºयावर हास्य फुलले. सलमाननेही नंतर लाडाने आपल्या भाच्याला जवळ केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सलमानच्या चाहत्यांना दोघा मामा-भाच्याचा हा अंदाज खूपच भावत आहे. दरम्यान, सलमान खानने नुकतेच त्याच्या ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. गेल्या ५० दिवसांपासून तो अबुधाबी येथे चित्रपटाची शूटिंग करीत होता. सध्या सलमान भाचा आहिल आणि परिवारासोबत लंडनला आहे.