Join us

​पाहा : ‘A Flying Jatt’चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 19:47 IST

टायगर श्रॉफ अभिनीत ‘ए फ्लार्इंग जट्ट’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये सुपरहिरोची आई आणि प्रेयसी दोन्ही दिसतील. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन व स्टंट्स सगळाच मसाला आहे.

टायगर श्रॉफ अभिनीत ‘ए फ्लार्इंग जट्ट’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये सुपरहिरोची आई आणि प्रेयसी दोन्ही दिसतील. या चित्रपटात अमृता सिंह हिने सुपरहिरो बननेल्या टायगरच्या आईची भूमिका साकारली आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींचा खात्मा करण्यासाठी मुलाला सतत प्रेरणा देणारी आई यात दिसणार आहे. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन व स्टंट्स सगळाच मसाला आहे. हवेत उडत असतानाही रस्त्यावरील सिग्नल फॉलो करणारा सुपरहिरो कदाचित तुम्ही प्रथमच यात बघाल. विनोद करणारा, आईचा राग झेलणारा आणि दमदार अ‍ॅक्शन करणारा सुपरहिरो यात तुम्हाला भेटेल. हॉलिवूडचा विलेन मैथन जोन्स या चित्रपटात दिसणार आहे. तर हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल जॅकलीन फर्नांडिस सुपरहिरोची प्रेयसी बनलेली आहे. चला तर पाहाच  ‘ए फ्लार्इंग जट्ट’चा दमदार ट्रेलर!!