Join us  

'मिर्झापूर'मधील सत्यानंद त्रिपाठी उर्फ कुलभूषण खरबंदा यांना लोक करताहेत शिवीगाळ, व्यक्त केली खंत

By तेजल गावडे | Published: November 10, 2020 11:07 AM

७६ वर्षीय अभिनेते कुलभूषण खरबंदा सध्या मिर्झापूर २मुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी या सीरिजमध्ये कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) यांच्या वडील सत्यानंद त्रिपाठीची भूमिका साकारली आहे.

७६ वर्षीय अभिनेते कुलभूषण खरबंदा सध्या चर्चेत आले आहेत. नुकताच मिर्झापूरचा दुसरा सीझन रिलीज झाला आहे. या सीझनमधील कुलभूषण खरबंदा यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्यांनी मिर्झापूर २मध्ये कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) यांच्या वडील सत्यानंद त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. सत्यानंद त्रिपाठी खूपच लबाड आणि मजेशीर आहेत. एकीकडे त्यांच्या कामाचे कौतूक होत आहे तर दुसरीकडे काही लोक त्यांना शिवीगाळ करत आहेत. याबाबत त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर खंत व्यक्त केली आहे.

कुलभूषण खरबंदा यांनी इंस्टा स्टोरीवर म्हटले की, तुमच्या लोकांचे प्रेम पाहून खूप छान वाटले. मात्र काही असेदेखील आहेत जे मला मेसेजमध्ये शिवीगाळ करत आहेत. ते पाहून मला वाईट वाटले. मी तुम्हा सर्वांना गुड लक देतो. डिजिटल जगात मी नवीन आहे आणि आता शिकतो आहे. 

पहिल्या सीझनमध्ये गाजलेल्या या वेबसीरीजमध्ये अली फजलसोबतच, पंकज त्रिपाठी दिवेन्दू शर्मा, विक्रांत मेसी, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गलसारखे कलाकारही आहे. हा शो उत्तरप्रदेशातील मिर्झापूर आणि तेथील खानदानावर आधारित आहे.

 'मिर्झापूर' वेबसीरीजचा दुसरा सीझन नुकताच रिलीज करण्यात आला. सोशल मीडियावर सगळीकडे याचीच चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांचा या सीरीजला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, या सुपरहिट वेबसीरीजचा तिसरा सीझनही आणण्याची तयारी केली जात आहे. आधीच ही सीरीज भारतात सर्वात जास्त बघितली गेलेली सीरीज ठरली आहे. अशात आता या सीरीजचे फॅन्स या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनचीही आतुरतेने वाट बघतील. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजपंकज त्रिपाठी