Join us  

सुशांत प्रकरणात AIIMS चा रिपोर्ट आल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी केलं मोठे विधान

By गीतांजली | Published: October 03, 2020 2:59 PM

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी साडे तीन महिन्यानंतर आलेल्या आत्महत्येच्या थेअरीला एम्स फॉरेंसिक टीमचा फायनल रिपोर्ट म्हटले जात आहे

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एम्स डॉक्टरांच्या एका पॅनेलने हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सीबीआयला सांगितले आहे. यावर रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, मी सीबीआयच्या अधिकृत वक्तव्याची वाट बघतो आहे, या सत्याला बदलू नाही शकतं.  

मानेशिंदे काय म्हणाले..टाईम नाऊच्या रिपोर्टनुसार, मानेशिंदे म्हणाले की, मी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एम्स डॉक्टरांच्या पॅनेलचे स्टेटमेंट बघितले आहे. ऑफिशियल पेपर्स फक्त एम्स आणि सीबीआयकडे आहेत तपास पूर्ण झाल्यावर ते कोर्टात दिले जातील. आम्ही सीबीआयच्या ऑफिशियल स्टेटमेंटची वाट बघतोय. 

सत्य बदलू नाही शकतमानेशिंदे पुढे म्हणाले, रिया चक्रवर्तीच्या  आम्ही नेहमीच असे म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत सत्य बदलले जाऊ शकत नाही. आम्ही नेहमीच सत्याच्यासोबत आहोत. सत्यमेव जयते. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी साडे तीन महिन्यानंतर आलेल्या आत्महत्येच्या थेअरीला एम्स फॉरेंसिक टीमचा फायनल रिपोर्ट म्हटले जात आहे. हा रिपोर्ट एम्सच्या पॅनेलने सीबीआयकडे सुपूर्द केला आहे ज्याचा सीबीआय अभ्यास करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या फॉरेंसिक पॅनेलने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्याकडून तपास पूर्ण केला आहे. इतकेच नाही तर सीबीआयला आपली वैद्यकीय आणि कायदेशीर मत देऊन फाइल बंद केली आहे. त्यानंतर आता सीबीआय एम्सच्या रिपोर्टसोबत त्यांच्या तपास जुळवून या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्यात जुंपली आहे. 

रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या या मंत्र्याच्या होती संपर्कात, सुशांतच्या मित्राचा दावा

सीबीआयनेच आता लवकर रिपोर्ट द्यावा; अनिल देशमुखांची सुशांत आत्महत्येवरून मागणी

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती