Join us  

सरोज खान यांच्या निधनानंतर आता पूर्ण होणार त्यांचे हे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 7:19 PM

2020 मध्ये नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन झाले.

ठळक मुद्देसरोज खान यांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या अनेक चित्रपटांपैकी एक चित्रपट कोरोनामुळे रिलीज होऊ शकला नाही. या चित्रपटाचे नाव ‘राग’ असून तो मध्य प्रदेशात आढळून येणाऱ्या ‘बेदिया’ समुदायावर आधारित आहे.

2020 मध्ये चित्रपट सृष्टीतील बऱ्याच दिग्गजांचे निधन झाले. त्यापैकी एक दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान सुद्धा आहेत. सरोज खान या बॉलिवूडमधील पहिल्या महिला नृत्यदिग्दर्शिका आहेत. 40 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी 3000 पेक्षा जास्त गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

सरोज खान यांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या अनेक चित्रपटांपैकी एक चित्रपट कोरोनामुळे रिलीज होऊ शकला नाही. या चित्रपटाचे नाव ‘राग’ असून तो मध्य प्रदेशात आढळून येणाऱ्या ‘बेदिया’ समुदायावर आधारित आहे. हा समुदाय आता सामान्यत: उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळतो. हा चित्रपट आता सिनेमागृहात रिलीज होणार आहे. चित्रपटात ‘बेदिया’ समाजातील एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. मधू शिक्षणाद्वारे समाजात बदल घडवून आणण्यासाठी बंडखोरी करते अशी या चित्रपटाची कथा आहे.

या चित्रपटात राजपाल यादव, राकेश बेदी, सुधा चंद्रन, मोहन जोशी, यशपाल शर्मा, मिलिंद गुणाजी, मनीषा मार्झारा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाविषयी पीयूष मुंढादा यांनी सांगितले की, “कोरोनामुळे गेल्या वर्षी सिनेमागृह बंद करण्यात आले होते. या दरम्यान आम्ही सरोज खान यांनाही गमावले. त्या आमच्या चित्रपटाच्या कणा होत्या. स्टोरी नृत्य दिग्दर्शन फायनल करण्यापासून ते चित्रपटामध्ये आयटम नंबरचा समावेश करण्यासाठीच्या सल्ल्यापर्यंत ते त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी म्हणजेच हिना पांचाळची कास्टिंग करण्यापर्यंत त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आता आम्ही 26 मार्च 2021 रोजी हा चित्रपट रिलीज करीत आहोत आणि हा चित्रपट त्यांना अर्पण करत आहोत.”

हवा हवाई , एक दो तीन, तम्मा तम्मा लोगे किंवा धक धक करणे लागा या गाण्यांसारखी जादू पसरवण्यात ‘राग’ चित्रपटाची गाणी सक्षम असतील की नाही याचा निर्णय लवकरच प्रेक्षक घेतील. चित्रपटाची गाणी ममता शर्मा, मोहित चौहान, पलक मुचल, रघुवीर यादव, रेखा राव, शान आणि शबाब साबरी यांनी गायली आहेत.

टॅग्स :सरोज खान