Join us  

Video : गुलमर्गमध्ये सारा अली खानची धम्माल मस्ती, आई अमृता सिंगला भरली धडकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 10:49 AM

सारा व तिच्या आईचा काश्मीर सफरीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सारा लवकरच ‘अतरंगी रे’ या सिनेमात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) तिच्या मस्तमौला स्वभावासाठी ओळखली जाते. कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवणारी सारा पुन्हा एकदा व्हॅकेशनवर आहे आणि यावेळी नेहमीप्रमाणे तिची आई आणि भाऊ तिच्यासोबत आहेत. आई अमृता सिंग (amrita singh), भाऊ इब्राहिमसोबत सारा काश्मीर सफरीवर गेली आहे. मग काय, या व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होणारच. सारा व तिच्या आईचा या सफरीवरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये सारा आणि तिची आई, अभिनेत्री अमृता सिंह  गुलमर्गमध्ये  ‘रोप वे’ने प्रवास करताना दिसत आहेत. सारा यावेळभ रोप वेचा आनंद घेतेय, शिवाय आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ शूट करतेय, दुसरीकडे साराची आई अमृता हिची घाबरगुंडी उडालीये. भीतीपोटी तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले आहेत. आईची ही अवस्था पाहून सारा तिची मजा घेताना दिसतेय. या प्रसंगाला आणखी मजेशीर करण्यासाठी तिचीच कॉमेंट्री सुरु आहे.रोप वे मधून उतरल्यानंतर सारा बर्फाच्छादित प्रदेशात सुटीची मजा घेताना दिसतेय. भावासोबतचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत.

व्हिडीओतील साराची कॉमेंट्री जबरदस्त आहे. तिची ही कॉमेंट्री चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. साहजिकच हा व्हिडीओ व्हायरल होतोय.काही दिवसांपूर्वी सारा आई व भावासोबत मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसली होती. या मालदिव व्हॅकेशनचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने शेअर केले होते.  वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सारा लवकरच ‘अतरंगी रे’ या सिनेमात दिसणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमात ती अक्षय कुमार व धनुषसोबत दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानअमृता सिंग