Join us  

सपना चौधरीचा जुना व्हिडोओ झाला व्हायरल,अवघ्या काही तासांतच मिळाले ७ लाखांहूनही अधिक व्हुयज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 7:17 PM

सपना चौधरीच्या यापूर्वी प्रदर्शित झालेला 'मेरा के नापेगा भरतार' या गाण्यालाही १० लाखांहून अधिक व्हयुज मिळाले होते.

हरियाणवी डान्स क्वीन म्हणून ओळखली जाणारी सपना चौधरीचे करोडो डान्स फॅन्स आहेत. सपना स्टेजवर परफॉर्म करत असेल किंवा व्हिडीओ अल्बममध्ये नेहमी ती नेहमी पारंपरिक अंदाजातच पाहायला मिळते. दिलखेचक डान्सने रसिकांची मनं जिंकणारी सपनाने नेहमीच आपल्या वेगवेगळ्या  व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असते. नुकतेच  सोशल मीडियावर सपना चौधरी एक गाणे सुरहिट ठरते आहे, सोशल मीडियावरील तिच्या नव्या व्हिडिओने रसिकांना अक्षरशा वेड लावलं आहे.ज्यात सपनाचा लूक आणि तिचा डान्स स्टेप नेहमीप्रमाणे रसिकांनाही थिरकायला भाग पाडत आहेत. तिच्या या नवीन  व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

सपना चौधरीने हरयाणवी गाण्यावर 'जादूगरणी' या गाण्यातून आपली अदाकारी दाखवत रसिकांची मनं जिंकली आहेत. तिचे व्हिडीओ चाहते युट्यूबवर वारंवार पाहत आहेत. हे गाणे 2019 मध्ये रिलीज झाले होते. 'जादूगरणी' हे गाणे सोमवीर कथुरवाल यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल नवीन बिशु बाबा यांनी लिहिले आहेत. या गाण्यात जिथे सपनाच्या सौंदर्यावर चर्चा होत आहे, तिथे गाण्यातली सपनाची देसी स्वॅगही मनाला भुरळ घालणारा असाच पाहायला मिळतो आहे. सपना चौधरीचे यापूर्वीही अनेक अल्बम सुपरहिट ठरले आहेत. प्रत्येक अल्बमला रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. 

 यापूर्वी प्रदर्शित झालेला 'मेरा के नापेगा भरतार' या गाण्यालाही १० लाखांहून अधिक व्हयुज मिळाले होते. या गाण्यावर सपनाने जबरदस्त डान्स केला आहे. सपनाच्या या हरियाणवी गाण्यावरील डान्सप्रमाणेच लूकसुद्धा वेगळा आहे. हे हरियाणवी गाणे देव कुमार देवा आणि कविता शोभु यांनी गायले आहे. गाण्याचे बोल विनोद मोखेरिया यांनी लिहिले आहेत.एकुणच डान्स हे तिचं पहिलं प्रेम आहे. त्यामुळेच काम म्हणून आणि आवड म्हणून डान्स तिच्यासाठी सर्वस्व आहे हेच यावरून पाहायला मिळते. 

टॅग्स :सपना चौधरी