Join us  

सपना चौधरीची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री! पाहा, ‘वीरे की वेडिंग’चे हे गाणे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 6:44 AM

हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, आपल्या ठुमक्यांनी सर्वांना घायाळ करणा-या सपनाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.

हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, आपल्या ठुमक्यांनी सर्वांना घायाळ करणा-या सपनाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. ‘बिग बॉस11’नंतर सपना चौधरीच्या बॉलिवूड डेब्यूकडे चाहते नजरा लावून बसले होते. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ‘वीरे की वेडिंग’ या चित्रपटात सपना आयटम साँग करताना दिसणार आहे. तिचे हे आयटम साँग काल रिलीज झाले. या गाण्यात सपना तिच्या चिर-परिचित हरियाणवी अंदाजात दिसते आहे. ‘हट्ट जा ताऊ’ असे या गाण्याचे शब्द आहेत. सुनिधी चौहानने हे गाणे गायलेले आहे.गाणे सुरू होताच, तुमच्या नजरा सपनाला शोधायला लागतात. गाणे सुरू झाल्यानंतर पूर्ण एक मिनिटांनी सपनाची एन्ट्री होते. आता तिची ही एन्ट्री किती आग लावते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बातमीसोबत दिलेला गाण्याचा व्हिडिओ बघायला हवा. ALSO READ : कानपूरमध्ये सपना चौधरीच्या ठुमक्यांनी गर्दी झाली अनियंत्रित! पोलिसांना करावा लागला लाठीमार!पुलकित सम्राट, कृती खरबंदा, जिमी शेरगिल स्टारर ‘वीरे की वेडिंग’ हा चित्रपट येत्या ९ मार्चला रिलीज होतो आहे. यात पुलकितने वीर अरोराची भूमिका साकारली आहे. पुलकितच्या अपोझिट दिसतेय ती कृती खरबंदा. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला होता. ट्रेलरमध्ये पुलकित व कृतीचा रोमान्स  करताना दिसला होता. या चित्रपटात जिमी शेरगील  पुलकितच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. मुलींच्या मागे फार फिरायचे नाही. कारण वेळ आलीचं तर येथून परतणे कठीण होऊन बसते, असे तो  पुलकितला समजवण्याचा प्रयत्न करतो.  पण पुलकित बराच पुढे निघून गेलाय. पुलकित व कृती एकमेकांवर प्रेम करतात. पण दोघांच्याही कुटुंबात बरेच मतभेद आहेत , असे या ट्रेलरमध्ये दिसले होते.