जॅकी श्रॉफ होणार संजय दत्तचे वडील?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 12:46 IST
‘जग्गू दादा’ अर्थातच जॅकी श्रॉफ आगामी संजय दत्त बायोपिक मध्ये सुनिल दत्तची भूमिका करू शकतो. नुकतेच त्याने रोलसाठी स्क्रीन ...
जॅकी श्रॉफ होणार संजय दत्तचे वडील?
‘जग्गू दादा’ अर्थातच जॅकी श्रॉफ आगामी संजय दत्त बायोपिक मध्ये सुनिल दत्तची भूमिका करू शकतो. नुकतेच त्याने रोलसाठी स्क्रीन टेस्ट दिली असून सुत्रांनुसार निर्माते-दिग्दर्शक त्याच्या नावाचा गांभीर्याने विचार करीत आहेत. सर्व काही जमून आल्यास जॅकी संजयच्या वडिलांची भूमिका साकारेल.राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर संजयची भूमिका करीत असून त्याच्या वडिलाच्या रोलसाठी मध्यंतरी आमिर खानचे नाव समोर आले होते. परंतु त्याने नकार दिल्यामुळे नव्या अभिनेत्याचा शोध सुरू झाला. निर्माता विधू चोपडाने मग जॅकीला विचारणा केली.जॅकी सांगतो, ‘कित्येक वर्षांनंतर मी एखाद्या रोलसाठी आॅडिशन दिली. विधू माझा चांगला मित्र असून त्याने जेव्हा स्क्रीन टेस्टबाबत विचारले तेव्हा मी लगेच होकार दिला. हे खरं आहे की, मी सुनिल दत्त यांच्यासारखा दिसत नाही आणि तशी दिग्दर्शकाची मागणीसुद्धा नाही. हा रोल माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक ठरणार हे नक्की.’ विशेष म्हणजे संजूबाबासुद्धा जॅकीबद्दल सकारात्मक आहे. जॅकी म्हणाला की, ‘संजूने माझे स्क्रीन टेस्टमधील फोटो पाहिले आणि त्याला आवडलेसुद्धा. मला भेटल्यावर त्याने ‘फ नटॅस्टिक’ अशी प्रतिक्रिया दिली. अद्याप मी चित्रपट स्वीकारलेला नाही पण रोलसाठी तयारी सुरू केली आहे. सुनिलसाहेबांचे जुने व्हिडिओज मी पाहतोय. त्यांच्या वागण्या-बोलण्याची पद्धत, खास करुन लोकांशी बोलताना ते ज्यापद्धतीने हात हलवायचे ते मी समजुन घेतोय.’ पुढील वर्षी जानेवारीमध्ये चित्रपटाची सुरू होणार आहे.हिरणीसुद्धा जॅकीचा फॅन असून त्याला धूम ३, औरंगजेब, हाऊसफु ल ३, ब्रदर्स चित्रपटातील त्याचे काम आवडले होते. राजूला सुनिलसाहेबांची जशास तशी नक्कल अपेक्षित नाही. केवळ त्यांचा अविर्भाव माझ्या अभिनयात दिसला पाहिजे बस्स, असे जॅकी सांगतो.