Join us  

तर संजय दत्तच्या बायोपिकची रिलीज जाऊ शकते लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 4:59 AM

यावर्षी रिलीज होणाऱ्या बिग बजेट चित्रपटांच्या यादीत संजय दत्तचा बायोपिक ही आहे. या चित्रपटाची वाट संजू बाबचे फॅन्स मोठ्या ...

यावर्षी रिलीज होणाऱ्या बिग बजेट चित्रपटांच्या यादीत संजय दत्तचा बायोपिक ही आहे. या चित्रपटाची वाट संजू बाबचे फॅन्स मोठ्या आतुरतेने बघता येत. संजय दत्तच्या आयुष्यात आलेले अनेक चढ-उत्तार यात दाखवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती रणबीर कपूर, सोनम कपूर आणि राजकुमार हिराणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार चित्रपटाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. ज्यामुळे कदाचित ठरलेल्या तारखेला चित्रपटात रिलीज होऊ शकत नाही. दत्तच्या बायोपिकमधले काही सीन्सवर दिग्दर्शक राजकुमार हिराणी सामाधानी नाही आहे त्यामुळे ते हे सीन्स पुन्हा शूट करू इच्छितात. बॉलिवूड लाईफच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिग्दर्शक या चित्रपटात संजय दत्तचे आयुष्य प्रेक्षकांसमोर ओपन बुक म्हणून ठेऊ इच्छितो. कारण यामुळे संजू दत्तने केलेल्या चुकांमधून प्रेक्षकांनी शिकावं यासाठी राजकुमार याचित्रपटावर मेहनत करताना दिसतायेत. म्हणून काही सीन्स ते पुन्हा शूट करणार आहेत.  प्रेक्षकांना या चित्रपटात संजूबाबाच्या जीवनातील अनेक खडतर प्रसंग बघावयास मिळणार आहेत. त्यामुळे चित्रपट रिलीज व्हायला थोडा उशीर होणार असल्याते समजते आहे. आता यात किती तथ्थ आहे हे आपल्याला लवकरच कळेल. याआधी हा चित्रपट जूनमध्ये रिलीज होणार होता.      सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक सीन परफेक्ट व्हावा, अशी रणबीरची इच्छा होती. त्याचमुळे ऐनवेळी रणबीरने काही सीन्सचे शूटींग पुन्हा करायला लावले. हा एक मोठा चित्रपट आहे, हे रणबीर जाणून आहे आणि कदाचित म्हणून त्याला सगळे काही अगदी परफेक्ट हवे आहे. केले त्यापेक्षाही परफेक्ट त्याला करायचे आहे. रणबीरने ऐनवेळी सुचवलेले बदल, हा याच परफेक्शनपर्यंत जाण्याचा प्रयत्न होता. या चित्रपटासाठी रणबीरने प्रचंड मेहनत घेतली आहे. संजय दत्त सारखे हुबेहुबे दिसण्यासाठी रणबीर कपूरने आपले वजन ही वाढवले होते.ALSO READ :  OMG! रणबीर कपूरला नकोशी झालीय ‘प्लेबाय’ इमेज!!या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त परेश रावल, अनुष्का शर्मा, मनीषा कोइराला आणि दिया मिर्झा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.