Join us  

कॅन्सरच्या उपचारासाठी संजय दत्त घेत नाहीये किमोथेरेपी, अशारितीने होतेय त्याची ट्रीटमेंट

By तेजल गावडे | Published: October 09, 2020 2:55 PM

सोशल मीडियावर नुकताच संजय दत्तचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात तो खूप कमकुवत दिसत होता. हा फोटो पाहिल्यानंतर असे म्हटले जात होते किमोथेरेपीमुळे त्याची तब्येत घटली आहे. मात्र यामागचं सत्य काही वेगळेच आहे.

सोशल मीडियावर नुकताच संजय दत्तचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात तो खूप कमकुवत दिसत होता. हा फोटो पाहिल्यानंतर असे म्हटले जात होते किमोथेरेपीमुळे त्याची तब्येत घटली आहे. मात्र यामागचं सत्य काही वेगळेच आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, संजय दत्तचे वजन २० किलोने घटलेले नाही आणि तो किमोथेरेपीदेखील घेत नाही आहे.  

दैनिक भास्करच्या रिपोर्ट्सनुसार, संजय दत्तच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, संजय दत्तचे वजन पाच किलो घटले आहे आणि तो किमो थेरेपी ऐवजी इम्युनोथेरेपी करतो आहे. संजय दत्तच्या जवळच्या व्यक्तीने त्याच्या तब्येतीबाबत नवीन अपडेट दिली आहे. त्यांच्यानुसार संजय किमो थेरेपी ऐवजी इम्युनोथेरेपी घेत आहे. यात एक नवीन टेक्निक आहे. ज्यात शरीरातील प्रतिरक्षक कोशिका कँसरच्या मेलिनेंट कोशिकांसोबत लढण्यासाठी मदत करत आहेत. त्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की संजय दत्तचा आजार इतका गंभीर नाही जितके मीडिया दाखवत आहे. तसेच त्याच्या जवळच्या व्यक्तींनी त्याच्या वीस किलो वजन घटल्याच्या दाव्यावरदेखील आक्षेप घेतला आहे.

त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, फोटो पाहून इतके वजन घटवल्याचा अंदाज कसा काय लावला. हा संजय दत्तसारख्या फायटर व्यक्तीचा अपमान आहे. सत्य तर हे आहे की तो दररोज दोन ते तीन तास जिममध्ये वेळ व्यतित करत आहे. आगामी चित्रपटासाठी त्याला स्लिम दिसायचे आहे.

तसेच तब्येत घटल्यामुळे संजय दत्तच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले की, संजय दत्तने मागील बऱ्याच काळापासून शेव्हिंग केली नव्हती. वाढलेल्या दाढीमुळे त्याच्या चेहरा व गालावरील सुरकुत्या दिसत नव्हत्या आणि चेहरा भरलेला वाटत होता.

नुकतेच दुबईला जाण्यापूर्वी संजय दत्तने क्लीन शेव केले आणि तिथून परतल्यानंतर बारीक चेहऱ्यामुळे खूप आजारी असल्याचे म्हटले. याउलट तो फिट आणि बरा आहे. तो दररोज नवीन लेखक आणि दिग्दर्शकांना भेटतो. मागील दोन दिवसात त्याने दोन-तीन दिग्दर्शकांकडून नवीन स्टोरीचे नरेशन घेतले आहे.

संजय दत्तच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टींना चित्रपट निर्माते रवी चड्ढाच्या जवळच्यांनीदेखील दुजोरा दिला आहे. रवी चड्ढा संजय दत्तसोबत 'डम डम डिगा डिगा' चित्रपट बनवत आहेत. यात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टीदेखील आहे. या चित्रपटाची निर्मिती यासवी फिल्म्स करत आहे. ज्यांनी नुकताच श्रेयस तळपदे आणि पवन मल्होत्रासोबत सेटर्स बनवली होती.

निर्मात्यांनी संजय दत्तच्या तब्येतीचा विचार करत मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग शेड्युल ठेवले आहे. याशिवाय संजय दत्त लवकरच शमशेराचे डबिंग आणि भुज प्राइड ऑफ इंडियाचे उरलेले काम पूर्ण करणार आहे.

 

टॅग्स :संजय दत्त