Join us

​माधुरी दीक्षितच्या ‘एन्ट्री’सोबतच ‘शिद्दत’मधून बाद झाला संजय दत्त!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 14:44 IST

अभिषेक बर्मन दिग्दर्शित ‘शिद्दत’ या आगामी चित्रपटात श्रीदेवी झळकणार होत्या. पण त्यांच्या अकाली निधनानंतर या चित्रपटात श्रीदेवींच्या जागी माधुरी ...

अभिषेक बर्मन दिग्दर्शित ‘शिद्दत’ या आगामी चित्रपटात श्रीदेवी झळकणार होत्या. पण त्यांच्या अकाली निधनानंतर या चित्रपटात श्रीदेवींच्या जागी माधुरी दीक्षितची वर्णी लागली. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षित व संजय दत्तची जोडी दिसेल अशी चर्चा होती. या चर्चेने चाहतेही सुखावले होते. कारण, या चित्रपटामुळे तब्बल २१ वर्षांनंतर संजय व माधुरी जोडी एकत्र दिसणार होती. पण आता हे शक्य नाही. होय, सूत्रांचे मानाल तर, माधुरीच्या एन्ट्रीनंतर संजयला हा चित्रपट सोडावा लागला आहे. धर्मा प्रॉडक्शनने संजयला तसे संकेत दिले आणि संजयनेही लगेच या चित्रपटातून अंग काढून घेतले. कारण माधुरी व संजय एकत्र येणे शक्य नव्हते. १९९३ मध्ये सुभाष घर्इंच्या ‘खलनायक’ मध्ये संजय व माधुरीची जोडी अखेरची एकत्र दिसली होती. पण यानंतर या दोघांनीही  एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. आता यामागची पार्श्वभूमी सगळ्यांनाच ठाऊक आहे. याकाळात संजय व माधुरीच्या अफेअरच्या चर्चां उठल्या होत्या. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन संजय माधुरीसोबत लग्न करणार, इथपर्यंत चर्चा होती. पण ‘खलनायक’ रिलीज होण्यापूर्वीच संजय दत्त टाडा केसमध्ये तुरूंगात गेला आणि माधुरीने संजयपासून अंतर राखणे सुरु केले. संजय तुरुंगातून सुटून बाहेर आल्यावरही माधुरी त्याला भेटली नाही. दोघांमधील अंतर इतके वाढले की,त्यांनी एकमेकांसोबत चित्रपट करणेही बंद केले. हा भूतकाळ बघता, ‘शिद्दत’मध्ये ही जोडी एकत्र येणे शक्य नव्हते आणि झालेही तसेच. माधुरीच्या एन्ट्रीसोबतचं संजय या चित्रपटातून बाद झाला. त्यामुळे आता या चित्रपटात माधुरीच्या अपोझिट कोण दिसते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.ALSO READ : संजय दत्त म्हणतो, ‘त्या’ पुस्तकातील सगळे किस्से खोटे! लेखकास पाठवले कायदेशीर नोटीस!!