Join us  

सनम बेवफा या चित्रपटातील नायिका आता राहाते परदेशात, करते हे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 3:52 PM

चांदनीचे सनम बेवफानंतरचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. सगळेच चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.

ठळक मुद्देचांदनीचे लग्न झाले असून तिला दोन मुली आहेत. चांदनी आज बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी तिचे बॉलिवूडवरील प्रेम थोडेदेखील कमी झालेले नाही.

सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या सनम बेवफा या चित्रपटाला ३० वर्षं पूर्ण झाले. हा चित्रपट त्याकाळात चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत. या चित्रपटात आपल्याला सलमानसोबत चांदनी ही अभिनेत्री पाहायला मिळाली होती. चांदनीच्या सौंदर्याची त्याकाळात चांगलीच चर्चा झाली होती. तिचा अभिनय देखील प्रेक्षकांना भावला होता. चांदनीचा हा पहिलाच चित्रपट होता. पण पहिल्याच चित्रपटामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण चांदनीचे यानंतरचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. तिने जवळजवळ १० चित्रपट तरी केले. पण सगळेच चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.

 

चांदनीने बॉलिवूड सोडल्यानंतर ती परदेशात स्थायिक झाली. ती एक खूप चांगली डान्सर असून ती सध्या लोकांना नृत्याचे धडे देत आहे. चांदनी विदेशात डान्स इन्स्टिट्युट चालवत आहे. चांदनीचे खरे नाव हे नवोदिता शर्मा असे असून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिचे नाव बदलले होते. चांदनी सध्या युएसमध्ये राहात असून ती ऑरलॉडो शहरात डान्स क्लास चालवते.

चांदनी ही खूप चांगली डान्सर असून तिने खूपच लहान वयात नृत्य शिकायला सुरुवात केली होती. चांदनीला नृत्यामध्ये करियर करण्याची इच्छा होती. पण बॉलिवूडमध्ये येण्याचा तिने कधी विचार देखील केला नव्हता. पण ती केवळ १७ वर्षांची असताना तिला ‘सनम बेवफा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

चांदनीचे लग्न झाले असून तिला दोन मुली आहेत. चांदनी आज बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी तिचे बॉलिवूडवरील प्रेम थोडेदेखील कमी झालेले नाही. तिने तिच्या मुलींची नावे ही करिश्मा आणि करिना अशी ठेवली आहे. यातूनच तिचे बॉलिवूडवरचे प्रेम दिसून येते. 

टॅग्स :सलमान खान