Join us  

वजन घटवण्यात कोमेजले या अभिनेत्रीचे बालपण, आता होतोय पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 11:42 AM

होय, फोटोतील हा चेहरा एका अभिनेत्रीचा आहे. हा तिच्या किशोरावस्थेतील फोटो आहे. फोटोतील ही मुलगी पुढे अभिनेत्री बनली. पण यासाठी तिला वजन घटवावे लागले. तिचे अख्खी किशोरावस्था वजन घटवण्यात गेली.

ठळक मुद्देअभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

होय, फोटोतील हा चेहरा एका अभिनेत्रीचा आहे. हा तिच्या किशोरावस्थेतील फोटो आहे. फोटोतील ही मुलगी पुढे अभिनेत्री बनली. पण यासाठी तिला वजन घटवावे लागले. तिचे अख्खी किशोरावस्था वजन घटवण्यात गेली. ही अभिनेत्री कोण तर समीरा रेड्डी. समीरा रेड्डी नुकतीच दुस-यांदा आई बनली. गत 12 जुलैला तिने एका मुलीला जन्म दिला. आज समीरा रेड्डी बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. तिनेच हा फोटो शेअर केला आहे.

‘ओळखा कोण? वय 13 वर्षे. वर्गात सर्वात धिप्पाड मुलगी, जे तिचा स्वत:लाच विचित्र वाटायचे. खरेच, कुणीतरी मला स्वत:वर प्रेम करायला शिकवायला हवे होते. मला लोक स्वीकारतील की नाही, याच चिंतेत आणि वजन घटवण्यात मी माझ्या शालेय जीवनातील अनेक वर्षे घालवली...’असे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे.

समीराने लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला. सध्या तिच्या संसारात आनंदी आहे. दोन मुलांच्या संगोपनात बिझी आहे. अलीकडे एका मुलाखतीत, समीरा यावर बोलली होती.

‘बॉलिवूड लाईमलाईटपासून दूर झाले आणि बॉलिवूडचे माझे सगळे मित्र दुरावले. गेल्या अनेक वर्षांत ना कुणी माझी आठवण काढली, ना कुणी माझ्याशी बोलले. प्रत्येक जण मला विसरला. आता बॉलिवूडचा एकही मित्र वा मैत्रिण माझ्या संपर्कात नाही. आता मलाही त्यांच्यासोबत राहण्यात कुठलाही रस राहिलेला नाही. एकेकाळी मला स्वत:बद्दल असुरक्षित वाटू लागले होते. मी प्रचंड घाबरले होते. पण माझ्यासोबत काय झाले, मी बॉलिवूड का सोडले, हे विचारण्याची साधी तसदीही कुणी घेतली नाही. अर्थात मला आता त्याची पर्वा नाही. मी माझ्या संसारात आनंदी आहे,’असे समीरा म्हणाली होती.

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

टॅग्स :समीरा रेड्डी