Join us  

'पूरे पचास हजार...' या शोलेतल्या एका डायलॉगसाठी सांभानं तब्बल २७ वेळा केला होता मुंबई ते बंगळुरू प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:04 AM

सत्तरच्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट शोलेतील सांभाच्या भूमिकेतून अभिनेते मॅक मोहन यांनी रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली होती.

सत्तरच्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट शोलेतील सांभाच्या भूमिकेतून अभिनेते मॅक मोहन यांनी रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली होती. या भूमिकेनंतर ते सांभाच्या नावाने प्रचलित झाले होते. मॅक यांनी सिनेमात कधीच मुख्य भूमिका केली नाही पण ते बॉलिवूडमधील बऱ्याच सिनेमात झळकले. मॅक मोहन रवीना टंडनचे मामा लागतात.

मॅक मोहन यांनी बॉलिवूडमधील प्रत्येक मोठ्या स्टारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. जवळपास तीन तासाच्या शोले सिनेमात सांभाने फक्त एकच डायलॉग बोलला होता आणि हा डायलॉग होता पूरे पचास हजार. या एका डायलॉगने ते जगभरात लोकप्रिय झाले होते.

तुम्हाला हा किस्सा समजल्यावर हैराण व्हाल कारण या एका डायलॉगच्या शूटिंगसाठी मॅक मोहन यांना मुंबई ते बंगळुरू असा २७ वेळा प्रवास केला होता. सुरूवातीला चित्रपटात त्यांची भूमिका मोठी होती. मात्र सिनेमाचे एडिटिंग झाल्यानंतर त्यांचा फक्त एकच डायलॉग होता.

मॅक मोहन शोलेचे एडिटिंग झाल्यानंतर सिनेमा पाहून खूप निराश झाले होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, जेव्हा मी चित्रपट पाहिला तेव्हा मी रडू लागलो होते. मी थेट दिग्दर्शक रमेश सिप्पींकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की माझा एवढी छोटीच भूमिका का ठेवली? तुम्हाला हवे होते तर हटवून टाकायचे. तेव्हा ते म्हणाले की, जर चित्रपट हिट झाला तर जग तुला सांभाच्या नावाने ओळखेल आणि असेच घडले.

१९६४ साली मॅक मोहन यांनी हकीकतमधून हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते. ४६ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास १७५ सिनेमात काम केले होते.ते अतिथी तुम कब जाओगेचे शूटिंग करत होते तेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या फुफ्फुसात ट्युमर आहे. त्यानंतर त्यांच्यावर खूप लांब उपचार झाले पण १० मे, २०१० रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

मॅक मोहन यांनी शार्गिद, अभिनेत्री, जंजीर, हीरा पन्ना, हंसते जख्म, मजबूर, प्रेम कहानी, हेरा फेरी, डॉन, चरस, काला पत्थर, जानी दुश्मन, कर्ज, कुर्बानी, शआम, दोस्ताना, कालिया, सत्ते पे सत्ता, लाल बादशाह, आग ही आग, इंसान यांसारख्या चित्रपटात काम केले होते.

टॅग्स :मॅक मोहन