Join us

सलमान खानच्या ट्यूबलाइटचे पाचवे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 13:37 IST

बॉलिवूडचा दंबग खान सलमान खानच्या ट्यूबलाइट चित्रपटाचे पाचवे टीजर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमानने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांने ...

बॉलिवूडचा दंबग खान सलमान खानच्या ट्यूबलाइट चित्रपटाचे पाचवे टीजर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमानने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांने हे पोस्टर शेअर केले आहे. आतपर्यंत या चित्रपटाचे 4 पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचा टीजर रिलीज होण्याच्या 5 दिवस आधीपासूनच सलमान रोज के पोस्टर टीजर रिलीज करतोय. सलमान खानचा हा कबीर खानसोबतचा तिसरा चित्रपट आहे. याआधी कबीरच्या बजरंगी भाईजान एक था टायगर या चित्रपटात सलमान आपल्याला दिसला होता.  ट्यूबलाइट कबीर खान ईदच्या दिवशी रिलीज करणार आहे.मात्र पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही आहे. पाकिस्तानातील काही निर्मात्यांनी याला विरोध केला आहे. ईदच्या दिवशी तिकडे चित्रपट प्रदर्शित होणार आहे जर ट्यूबलाईट ही त्याच दिवशी प्रदर्शित झाला तर त्याचा फटका तिकच्या चित्रपटांना बसेल असे पाकिस्तानच्या स्थानिक निर्मात्यांचे म्हणणे आहे.  ट्यूबलाइटची शूटिंग लेह, लद्दाख आणि मनाली येथे झाली आहे. या चित्रपटचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यात सलमान आणि शाहरुख दोघांमध्ये एकत्र दिसणार आहेत. यात शाहरूख खान कॅमिओ करणार आहे.चित्रपटात भारत - इंडो युद्धाप्रसंगीची कथा दाखविण्यात आली आहे.  चित्रपटात सोहोल खानचीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे.