-तर काय सलमान खानच्या ‘रेस3’ला केवळ २४ तासांत मिळाले सेन्सॉरचे प्रमाणपत्र!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 18:27 IST
आधी ऊठसूठ चित्रपटांवर कात्री चालवणारे (हा आमचा आरोप नाही.) सेन्सॉर बोर्ड अलीकडे फारचं तत्पर झालेले भासतेय. ताज्या बातमीवरून तरी ...
-तर काय सलमान खानच्या ‘रेस3’ला केवळ २४ तासांत मिळाले सेन्सॉरचे प्रमाणपत्र!!
आधी ऊठसूठ चित्रपटांवर कात्री चालवणारे (हा आमचा आरोप नाही.) सेन्सॉर बोर्ड अलीकडे फारचं तत्पर झालेले भासतेय. ताज्या बातमीवरून तरी हेच दिसतेय. ताजी बातमी खरी मानाल तर सेन्सॉर बोर्डाने सलमान खानचा आगामी चित्रपट ‘रेस3’ला केवळ २४ तासांत प्रमाणपत्र जारी केले. अर्थात या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने बुधवारी ‘रेस3’ बघितला आणि गुरूवारी दुपारपर्यंत चित्रपटाला प्रमाणपत्र जारी केले. या चित्रपटाला यु/ए प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या संवादात काही बदल सुचवले. पण त्याव्यतिरिक्त चित्रपटात एकही कट न सुचवता त्यास पास केले.तुम्हाला आठवत असेलचं की, ‘पद्मावत’च्या रिलीजवेळी ६५ दिवसांचा मुद्दा उपस्थित केला गेला होता. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी निर्मात्यांना आपला चित्रपट रिलीजच्या ६५ दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे सादर करावा लागेल. पण काहींच्या बाबतीत हा नियम सर्रास पायदळी तुडवला जात आहे. सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्यावेळीही हा नियम डावलला गेला होता. आता ‘रेस3’बद्दलही कदाचित हेच झाले आहे. हा चित्रपट येत्या १५ जूनला रिलीज होतोय.ALSO READ : ‘रेस3’चे चौथे गाणे ‘पार्टी चले आॅन...’ रिलीज! गाण्यातील ‘पाऊट सीन’ एकदा पाहाच!!सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांची कारकिर्द बरीच वादळी ठरली होती. त्यांच्या जागी गीतकार, पटकथा लेखक आणि अॅड गुरु प्रसून जोशी हे यांची सेन्सॉर बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. १९ जानेवारी २०१५ रोजी पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यांच्या वादग्रस्त मार्गदर्शक तत्त्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्यावर नाराज होते. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या ‘उडता पंजाब’, ‘इंदू सरकार’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि सध्या प्रसिद्धीच्या वाटेवर असलेल्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. या सगळ्या कारणांवरून त्यांच्याविरुद्धचा रोष सातत्याने वाढत होता. गेल्याच आठवड्यात काही दिग्दर्शकांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत घेतली होती. यावेळी त्यांनी पहलाज निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती.