Join us  

सलमान खानचा ब्लॉकबस्टर 'बजरंगी भाईजान'चा येणार सीक्वल, स्क्रीप्ट आहे तयार; पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 12:29 PM

अभिनेता सलमान खान(Salman Khan)चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बजरंगी भाईजान'(Bajrangi Bhaijaan) ने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. या चित्रपटानंतर त्याच्या सीक्वलची वारंवार चर्चा होताना दिसली. आता पुन्हा एकदा या सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे.

अभिनेता सलमान खान(Salman Khan)चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बजरंगी भाईजान'(Bajrangi Bhaijaan) ने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. या चित्रपटानंतर त्याच्या सीक्वलची वारंवार चर्चा होताना दिसली. आता पुन्हा एकदा या सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. आता या चित्रपटासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. जी ऐकून सलमानचे चाहते खूश होणार आहेत. चित्रपटासंदर्भात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, निर्मात्यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट तयार करून ठेवली आहे. फक्त अद्याप चित्रपट बनण्यासाठी अडथळा आहे.

बजरंगी भाईजान २ चित्रपटाची स्क्रिप्ट तयार असल्याची बातमी समोर आली आहे, मात्र सलमान खानच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. वास्तविक, नुकताच आयुष शर्माच्या आगामी 'रुस्लान' चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात निर्माता केके राधामोहन यांनी एक रोमांचक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, 'बजरंगी भाईजान २'ची स्क्रिप्ट तयार आहे. 

बजरंगी भाईजानचे कथा लेखक आणि एसएस राजामौली यांचे वडील व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्याकडे वळत राधामोहन म्हणाले की, पटकथा लवकरच सलमान खानला सांगितली जाईल. सलमानने स्क्रिप्ट ऐकून संमती दिल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. मात्र, ते 'बजरंगी भाईजान २'ची निर्मिती करत नसल्याचे त्यांनी सांगितले. या वृत्तानंतर सीक्वलबाबत प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढली आहे.

२०२१ मध्ये सिक्वलची झाली घोषणा सलमान खानने २०२१ मध्ये बजरंगी भाईजानच्या सिक्वेलची घोषणा केली. यानंतर त्याने के.व्ही विजयेंद्र प्रसाद चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याचा खुलासाही केला. या चित्रपटाचे नाव 'पवन पुत्र भाईजान' असे ठेवण्यात आले आहे. चर्चा अशी आहे की, पूजा हेगडेला या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे. मात्र, या चित्रपटात करीना कपूरच्या जागी पूजाला घेण्यात आल्याचेही वृत्त आहे. त्याचबरोबर पूजा या चित्रपटात करीनाची जागा घेणार की आणखी काही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार हे पाहणे बाकी आहे.

बजरंगी भाईजानला मिळाला होता उत्स्फुर्त प्रतिसाद'बजरंगी भाईजान' बद्दल बोलायचे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले होते. चित्रपटाची कथा एका नि:शब्द पाकिस्तानी मुलीभोवती फिरते जी चुकून सीमा ओलांडून भारतात येते. निरागस मुलीला तिच्या कुटुंबाकडे सोडण्याची जबाबदारी सलमान खानने घेतली आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टॅग्स :सलमान खान