Join us  

सलमान खानच्या हत्येच्या कटाचा पर्दाफाश, शार्पशूटरचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 6:08 AM

वांद्रे परिसरात दोन दिवस मुक्कामही केला होता, अशी खळबळजनक माहिती शार्पशूटर राहुलने चौकशी दरम्यान दिली,

फरिदाबाद : शार्पशूटर राहुलच्या अटकेने अभिनेता सलमान खान याच्या हत्या करण्याचा कटाचा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडाली आहे. हरियाणा पोलिसांनी फरीदाबादच्या एका व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी १५ आॅगस्ट रोजी शार्पशूटर राहुल ऊर्फ बाबा ऊर्फ सुन्नी याला उत्तराखंडमधून अटक केली होती. राहूल हा पंजाब-हरियाणातील कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीचा शार्पशूटर आहे.सलमान खानवर पाळत ठेवण्यासाठी जानेवारीत टेहळणीसाठी मुंबईला गेलो होतो. वांद्रे परिसरात दोन दिवस मुक्कामही केला होता, अशी खळबळजनक माहिती शार्पशूटर राहुलने चौकशी दरम्यान दिली, असे पोलीस उपायुक्त राजेश दुग्गल यांनी सांगितले. लॉरेन्स बिष्णोईच्या सांगण्यानुसार त्याने मुंबईत टेहळणी केली होती, असे पोलिसांनी सांगितले.।पनवेलच्या फार्महाउसवर पोलीस बंदोबस्तनवीन पनवेल : अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचल्याची माहिती पुढे आल्यानंतर सलमान खान सध्या राहत असलेल्या पनवेल तालुक्यातील फार्महाउसवर दोन बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे.फरीदाबाद पोलिसांनी राहुलला अटक केल्यानंतर त्याने सलमान खानच्या खुनाचा कट रचला असल्याची कबुली दिली आहे. काळवीट शिकारप्रकरणी लॉरेन्स विष्णूने यापूर्वीही सलमानला मारण्याची धमकी दिली होती. कोरोनामुळे सलमान गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पनवेल तालुक्यातील वाजे येथील फार्महाउसवर मुक्काम ठोकून आहे. या फार्महाउस परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पनवेल पोलिसांनी त्याच्या फार्महाउसवर दोन बंदूकधारी पोलीस नेमले आहेत. 

टॅग्स :सलमान खान