Join us  

Salman Khan Injury: टायगर ३च्या सेटवर सलमान खानला झाली दुखापत, फोटो शेअर करत म्हणाला-टाइगर जख्मी है

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 7:12 PM

'टायगर 3'च्या सेटवरचा सलमान खानचा फोटो पाहून चाहते काळजीत पडले आहेत.

 बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'किसी का भाई किसी की जान' नंतर आता त्याचा नवीन चित्रपट टायगर 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता त्याने चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर चाहते काळजीत पडले आहेत. सलमान खानने सांगितले की, तो 'टायगर 3'च्या सेटवर तो  जखमी झाला होता.

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर टायगर 3 चित्रपटाच्या सेटवरील त्याचा एका लेटेस्ट फोटो शेअर केला आहे,  ज्यामध्ये त्याचा चेहरा दिसत नाही, परंतु त्याच्या डाव्या खांद्यावर रिलीविंग पॅच लावेला दिसत आहे. सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले,  'जब आपको लगता है कि आपने दुनिया का भार अपने कंधों पर उठाया हुआ है, तो वह कहता है कि दुनिया को छोड़ो पांच किलो का डम्बल उठा के दिखाओ. #टाइगर जख्मी है. टाइगर 3.'

फोटोमध्ये सलमान खानची ही अवस्था पाहून चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'लवकर बरे हो'. दुसर्‍याने लिहिले,  'स्वतःची काळजी घे'. तर आणखी एका चाहत्याने लिहिले की, 'जखमी वाघ आणखी खातरनाक आहे.'

 सलमान खानचा 'टायगर 3' हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. यामध्ये कतरिना कैफ अभिनेत्यासोबत दिसणार आहे. 'टायगर 3'मध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानही कॅमिओ करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होऊ शकतो. या फ्रँचायझीचे शेवटचे दोन भाग 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' सुपरहिट ठरले. 

टॅग्स :सलीम खानटायगर जिंदा है