Join us  

बॉलिवूडमध्ये फ्लॉप होऊनही सलमान खानची ही नायिका आज कमावतेय प्रचंड पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 6:30 PM

सनम बेवफा हा सलमानच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळातील चित्रपट होता. या चित्रपटात प्रेक्षकांना चांदनी ही नायिका पाहायला मिळाली होती.

ठळक मुद्देसनम बेवफा या चित्रपटाची ही नायिका आता विदेशात डान्स इन्स्टिट्युट चालवत आहे. सी स्टुडिओज असे तिच्या डान्स इन्स्टिट्यूटचे नाव असून ते ऑरलॉडो शहरात आहे.

सलमान खानचा भारत हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेक्षकांनी देखील पहिल्याच दिवशी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. सलमानच्या भारत या चित्रपटात कतरिना कैफ त्याची नायिका असून या दोघांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना आवडत आहे.

सलमानने आजवर त्याच्या कारकिर्दीत अनेक नायिकांसोबत काम केले आहे. काही नायिका आजही बॉलिवूडमध्ये काम करत आहेत तर काही अभिनयक्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात आपले भाग्य आजमावत आहेत. सनम बेवफा हा सलमानच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळातील चित्रपट होता. या चित्रपटात प्रेक्षकांना चांदनी ही नायिका पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय आणि सलमानसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. 

चांदनीने या चित्रपटानंतर हिना, जय किशन, आजा सनम, हाहाकार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सनम बेवफा या चित्रपटानंतरचे चांदनीचे सगळेच चित्रपट फ्लॉप ठरले. त्यामुळे तिने बॉलिवूडपासून दूर जाणेच पसंत केले. चांदनी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी विदेशात आज तिने चांगलेच नाव कमावले आहे.

चांदनीचे खरे नाव हे नवोदिता शर्मा असे असून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिचे नाव बदलले होते. चांदनी सध्या युएसमध्ये राहात असून ती ऑरलॉडो शहरात डान्स क्लास चालवते. चांदनी ही खूप चांगली डान्सर असून तिने खूपच लहान वयात नृत्य शिकायला सुरुवात केली होती. चांदनीला नृत्यामध्ये करियर करण्याची इच्छा होती. पण बॉलिवूडमध्ये येण्याचा तिने कधी विचार देखील केला नव्हता. पण ती केवळ 17 वर्षाची असताना तिला सनम बेवफा या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 

सनम बेवफा या चित्रपटाची ही नायिका आता विदेशात डान्स इन्स्टिट्युट चालवत आहे. सी स्टुडिओज असे तिच्या डान्स इन्स्टिट्यूटचे नाव असून ते ऑरलॉडो शहरात आहे. तिने केवळ पाच मुलांसोबत तिच्या या डान्स इन्स्टिट्यूटची सुरुवात केली होती. आता या डान्स इन्स्टिट्यूटचा पसारा प्रचंड वाढला असून यात अनेक मुले नृत्य शिकतात. ती तिच्या इन्स्टिट्यूटच्या मुलांसोबत अनेक स्टेज शो देखील करते. चांदनी भारतीय तसेच पाश्चिमात्य नृत्य मुलांना शिकवते. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर ती नृत्याचे कार्यक्रम आयोजित करते. 

चांदनीचे लग्न झाले असून तिला दोन मुलीदेखील आहेत. चांदनी आज बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी तिचे बॉलिवूडवरील प्रेम थोडेदेखील कमी झालेले नाही. तिने तिच्या मुलींची नावे ही करिश्मा आणि करिना अशी ठेवली आहे. यातूनच तिचे बॉलिवूडवरचे प्रेम दिसून येते. 

टॅग्स :सलमान खानभारत सिनेमा