Join us  

आयपीएल सट्टा प्रकरणात अरबाज खानचे नाव आल्यानंतर सलमान खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 1:22 PM

अरबाजच्या सट्टा प्रकरणावर सलमान काय प्रतिक्रिया देणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती. पण सलमानने यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अरबाजला समन्स मिळाल्यानंतर सलमानच्या मनाची अवस्था काय झाली होती याबाबत त्याने सांगितले आहे.

सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानचे नाव आयपीएल सट्टा प्रकरणात आले होते. अरबाजने देखील आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची कबुली दिली होती. तसेच गेल्या पाच वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची माहितीदेखील त्याने पोलिसांना दिली होती. जलालकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला असून त्याने काही दिवस पैसे दिले. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी जलालने अरबाजकडे तगादा लावला होता. पण अरबाज त्याला प्रतिसाद देत नव्हता. याचप्रकरणी जलालने त्याला धमक्याही दिल्या होत्या. सोशल मीडियावर अरबाज आणि जलाल यांचे फोटोही व्हायरल झाले होते. जलालच्या मोबाइलमध्येही काही बुकी तसेच अरबाजचे फोटो जलालसोबत मिळाले होते.अरबाजच्या सट्टा प्रकरणावर सलमान काय प्रतिक्रिया देणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती. पण सलमानने यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अरबाजला समन्स मिळाल्यानंतर सलमानच्या मनाची अवस्था काय झाली होती याबाबत त्याने सांगितले आहे. सलमानने मुलाखतीत सांगितले की, तुम्हाला यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. तुम्ही कोणत्याही मनःस्थितीत असाल तरी तुम्हाला लोकांच्या समोर हसावे लागले, चित्रपटात अभिनय करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही टिव्हीवर हसताना दिसलात तर घरात असे घडले असले तरी याला काहीही फरक पडत नाही असे लोक म्हणतात. हे केवळ आमचे काम आहे याचा विचार देखील ते करत नाहीत. आम्ही कितीही टेन्शनमध्ये असलो तरी आम्हाला आमचा शॉर्ट व्यवस्थित द्यावा लागतो. लोकांसमोर हसावे लागते. अरबाजला समन्स आल्यानंतर देखील मी रेस 3 च्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो. त्यावेळी मी लोकांसमोर माझे दुःख दाखवू शकत नव्हतो. काम करणे हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्यामुळे माझे कुटुंब, मित्रमैत्रीण कोणत्याही परिस्थितीत असले तरी मला माझे काम हे करावेच लागते.  

टॅग्स :सलमान खानअरबाज खानआयपीएल २०२३