Join us  

सलमाने पुन्हा वेधले लक्ष, कोणाच्या तरी आठवणीत झालाय दंग, कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 4:02 PM

फार्महाऊसमधलाचा सलमानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो निवांत क्षणाचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दबंग सलमान खानची प्रत्येक गोष्ट खास असते. मग त्याचा अभिनय असो, डान्स असो किंवा त्याच्या हरकती प्रत्येक बाब रसिकांसाठी स्पेशल असते. भाईजान म्हणून रसिकांच्या मनात घर केलेल्या आपल्या या लाडक्या अभिनेत्यावर ते जीव ओवाळून टाकण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. सलमानविषयी रसिकांचं प्रेम इतकं आहे की त्याच्या  आयुष्यात काय सुरु आहे याबाबत जाणून घेण्यास ते फार उत्सुक असतात. 

 

सलमानचं हे फार्महाऊस दीडशे एकर जागेत पसरलं आहे.आजूबाजूला डोंगर अन् त्या मधोमध हे विस्तीर्ण आलिशान असं सलमानचं फार्महाऊस पसरलंय. स्विमिंग पूल, बाईक रायडिंग आणि घोडेस्वारीसाठी या फार्महाऊसमध्ये विशेष जागा ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी सलमानचे अनेक घोडेसुद्धा आहेत. सलमान आपल्या फिटनेस आणि बॉडीबाबत बराच काटेकोर आहे. त्यामुळे कुठेही असला तरी तो आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होऊ देत नाही.

हीच बाब लक्षात घेऊन या फार्महाऊसवर सलमानसाठी खास सुसज्ज अशी जिमही उभारण्यात आली आहे. आपल्या खास मित्रांसह सलमान याच फार्महाऊसवर धम्माल पार्ट्या करतो. इतकंच नाही तर दिलदार अशी ओळख असलेला सलमाननं आपल्या बॉलीवुडच्या मित्रांनाही या फार्महाऊसवर पार्ट्यांसाठी आमंत्रित केलं होतं. 

कोरोनाकाळात सलमान पणवेलधल्या त्याच्या या फार्महाऊसवरच राहायचा. फार्महाऊसमधलाचा सलमानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो निवांत क्षणाचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. सलमानच्या फार्म हाऊसवर घोडेही आहेत.

 

अनेकदा तो घोडेस्वारी करतानाही दिसतो. समोर आलेल्या व्हिडीओत सलमान घोड्याला चारा देत आहे, चारा देण्याची सलमानची स्टाइलही वेगळीच आहे.सलमानचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून चाहतेही पसंती देत आहेत. व्हिडीओमध्ये सलमान कोणाला तरी खूप मिस करत असल्याचेही तुम्हाला जाणवेल. तुर्तास सलमानचा हा ऑफस्क्रीन अंदाज पाहून चाहते त्याची वाहवा करत आहेत.

टॅग्स :सलमान खान