Join us

जामीन मिळताच काही तासांतच सलमान खानची सुटका; विशेष विमानाने मुंबईत दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 19:51 IST

सुपरस्टार सलमान खानला जोधपूर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर काही तासांतच तो तुरुंगाबाहेर आला आहे. काही वेळापूर्वीच त्याने जोधपूर विमानतळ ...

सुपरस्टार सलमान खानला जोधपूर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर काही तासांतच तो तुरुंगाबाहेर आला आहे. काही वेळापूर्वीच त्याने जोधपूर विमानतळ गाठले असून, विशेष विमानाने (चार्टर्ड प्लेन) तो मुंबईत दाखल झाला आहे. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावताना त्याची रवानगी जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात केली होती. दोन दिवसांनंतर त्याला याप्रकरणी जामीन मंजूर करताच तो तुरुंगाबाहेर आला आहे. दरम्यान, न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावताच सलमानच्या वतीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी या अर्जावर दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने शनिवारी जामिनावर निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर भाईजान शनिवारी तरी तुरुंगाबाहेर येणार काय? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते. त्यातच या प्रकरणातील न्यायाधीशांची ऐनवेळी बदली करण्यात आल्याने भाईजानला शनिवारी ‘बेल की जेल’ असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, आज न्यायालयाने सलमानच्या जामीन अर्जावर दुपारी तीन वाजता निर्णय देताना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर सलमान सायंकाळी उशिरापर्यंत तुरुंगाबाहेर येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु या सर्वच शक्यता फोल ठरल्या. कारण जामीन मिळाल्याच्या काही तासातच त्याची तुरुंगातून सुटका झाली. सध्या सलमानने थेट जोधपूर विमानतळ गाठले असून, तेथून तो विशेष विमानाने मुंबईला येणार आहे. सलमानच्या सुटकेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी असून, सलमान मुंबईला पोहोचल्यानंतर चाहत्यांना भेटणार काय याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, जेव्हा सलमान तुरुंगाबाहेर आला तेव्हा त्याचा बॉडीगार्ड शेरा उपस्थित होता. त्याचबरोबर सलमानच्या दोन्ही बहिणी त्याच्यासोबत होत्या. न्यायालयाने नमुद केलेले काही मुद्दे- सलमान खानला न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही.- ७ मे रोजी होणाºया सुनावणीदरम्यान सलमानला न्यायालयात हजर रहावे लागणार. - जानकारांच्या मते, एकदा जामीन मिळाल्यानंतर कारागृह प्रशासन आरोपीला अधिक काळ कारागृहात ठेऊ शकत नाहीत. - सलमान खानला तुरुंगाबाहेर काढण्यासाठी ५.३० वाजेपर्यंत न्यायालयाचे आदेश कारागृह प्रशासनाकडे पोहोचले. - तुरुंगात दोन दिवस राहिल्यानंतर सलमान आज बाहेर आला.