Join us  

Flashback : अनेक वर्षांपासून गायब आहे सलमान खानची ही पहिली हिरोईन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 4:00 PM

बॉलिवूडचा दबंग खान सध्या ‘दबंग 3’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. पण सलमानने ज्या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता, ती अभिनेत्री कुठे आहे, हे तुम्ही जाणता?

ठळक मुद्देम्हणायला रेणूने श्रीदेवी, ऋषी कपूर, विनोद खन्ना सारख्या अभिनेत्यांसोबत काम केले. पण तिच्या भूमिका इतक्या छोट्या होत्या की, तिला यश मिळू शकले नाही.

बॉलिवूडचा दबंग खान सध्या ‘दबंग 3’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. पण सलमानने ज्या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता, ती अभिनेत्री कुठे आहे, हे तुम्ही जाणता?1988 मध्ये रिलीज झालेल्या ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे सलमानने डेब्यू केला होता. या चित्रपटात फारूख शेखने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तर सलमान निगेटीव्ह रोलमध्ये होता. या चित्रपटात सलमानच्या हिरोईनची भूमिका साकारली होती ती अभिनेत्री रेणूू आर्या हिने.

रेणू चित्रपटात सलमानची प्रेयसी होती. तिचा भोळा, निष्पाप चेहरा आणि बोलके डोळे पडद्यावर उठून दिसले होते. रेणूचाही हा पहिला चित्रपट होता. म्हणजेच सलमानप्रमाणेच तिने या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता.

‘बीवी हो तो ऐसी’ यानंतर ‘चांदनी’, ‘जंगबाज’ यासारख्या हिट चित्रपटांत काम केले. या चित्रपटांनंतर रेणूचे फिल्मी करिअर चार वर्षे चालले. मात्र चार चित्रपटांनंतर ती अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. 1991 मध्ये ‘बंजारन’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. गेल्या अनेक वर्षांत रेणू कुठे आहे, हे कुणालाही ठाऊक झाला.

अनेक वर्षांपूर्वी रेणू एकदा फ्लाईटमध्ये दिसल्याचे सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते. पण त्यावेळी रेणू इतकी बदलली होती की, तिला ओळखणेही कठीण होते. यानंतर कदाचित फिल्म इंडस्ट्रीच्या कुठल्याही व्यक्तीने तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणायला रेणूने श्रीदेवी, ऋषी कपूर, विनोद खन्ना सारख्या अभिनेत्यांसोबत काम केले. पण तिच्या भूमिका इतक्या छोट्या होत्या की, तिला यश मिळू शकले नाही.

टॅग्स :सलमान खान