Join us  

In Pics: ‘भारत’च्या रिलीजआधी क्रेजी झालेत फॅन्स! सोशल मीडियावर Only भाईजान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 4:24 PM

येत्या बुधवारी सलमानचा ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय आणि भाईजानचा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहते पुन्हा एकदा ‘सैराट’ झाले आहेत. 

ठळक मुद्दे‘भारत’ या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या पाच लूकमध्ये दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे.

केवळ मोदी आणि परमेश्वराचेच भक्त असू शकतात, असे तुम्ही मानत असाल तर ते चूक आहे. होय, कारण या यादीत भाईजान सलमान खानचेही नाव आहे. सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे आणि लाखो चाहते त्याच्यावर अगदी जीव ओवाळून टाकतात. सलमानचा चित्रपट आला रे आला की, चाहत्यांच्या त्यावर उड्या पडतात. लवकरच म्हणजे, येत्या बुधवारी सलमानचा ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय आणि भाईजानचा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहते पुन्हा एकदा ‘सैराट’ झाले आहेत.  चाहते ‘भारत’ पाहण्यास किती उत्सुक आहेत, हे ट्वीटरवर असल्यास तुम्हाला कळेल. चाहते अगदी क्रेजी  झाले आहेत. अनेक चाहत्यांनी ‘भारत’च्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रेजी व्हिडीओ शेअर केले आहेत. 

शुभम नावाच्या या चाहत्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला केवळ आणि केवळ सलमानच्या ‘भारत’चे होल्डिंग्स लागलेले दिसत आहेत.

 

या मुलानेही सलमानचा ‘भारत’ पाहण्यासाठी अख्खे थिएटर बुक केले आहे. केवळ इतकेच नाही तर सर्व चाहत्यांना तो तिकिट बुक करण्याचे आवाहन करतोय.

 

गुवाहाटीच्या एका चाहत्याने आपल्या गाडीमागे ‘भारत’चे पोस्टर चिपकवले आहे. इंदोरच्या एका फॅन क्लबने ‘भारत’ पाहण्यासाठी एकाच वेळी २३५ तिकिटे बुक केलीत.

 एका चाहत्याने तर चक्के ‘भारत’ हे नावचं आपल्या डोक्यावर कोरले आहे. 

 

 

‘भारत’ या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या पाच लूकमध्ये दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. भारत या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफसोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.   

टॅग्स :भारत सिनेमासलमान खान