Join us  

फोटोतील हा चिमुकला आज आहे सुपरस्टार, बॉलिवूडमध्ये पूर्ण केलीत 31 वर्षे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:29 AM

फोटोतील हा चिमुकला कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वाचा

ठळक मुद्देसध्या सलमान ‘दबंग 3’च्या शूटींगमध्ये बिझी आहे.

फोटोतील हा चिमुकला कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो आहे, सुपरस्टार सलमान खान. होय, सलमानने स्वत: हा फोटो शेअर केला आहे. निमित्त आहे, बॉलिवूड इंडस्ट्रीत 31 वर्षे पूर्ण झाल्याचे. 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून सलमानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. पण पर्दापणाचा हा पहिलाच चित्रपट दणकून आपटला. पुढच्या वर्षी सलमानचा ‘मैंने प्यार किया’ प्रदर्शित झाला आणि सलमानला एक नवी ओळख मिळाली. यानंतर सलमानने कधीच मागे वळून बघितले नाही. पाहता पाहता त्याला इंडस्ट्रीत 31 वर्षे पूर्ण झालीत.बॉलिवूडमध्ये 31 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलमानने बालपणीचा एक फोटो पोस्ट करत, चाहत्यांचे आभार मानले. ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील माझ्या 31 वर्षांच्या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल आभार. चाहते आणि शुभचिंतकांचेही आभार,’असे सलमानने या फोटोसोबत लिहिले.

 ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात सलमानने प्रेम नावाचे पात्र साकारले होते. त्याने साकारलेला हा आॅनस्क्रीन ‘प्रेम’ इतका हिट झाला की, पुढे जवळपास 15 चित्रपटात त्याने याच नावाचे पात्र साकारले.  ‘मैंने प्यार किया’नंतर सलमानने साजन, हम आपके है कौन यासारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. त्याचे काही चित्रपट फ्लॉपही झालेत. पण दरवेळी त्याने जोरदार वापसी केली. 31 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये सलमान त्याच्या रिअल आयुष्यांतील वादांमुळे गाजला. पण त्याची  फॅन फॉलोर्इंग कधीच कमी झाली नाही. तीन दशकांच्या कारकिर्दीत सलमान वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला. पाहुया त्याचे काही असेच काही लूक...

 

टॅग्स :सलमान खान