Join us  

​सलमान खान आला या अभिनेत्याच्या मदतीला धावून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 6:48 AM

बरसात या चित्रपटाद्वारे बॉबी देओलने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या या चित्रपटात ट्विंकल खन्ना त्याची नायिका होती. या चित्रपटातील ...

बरसात या चित्रपटाद्वारे बॉबी देओलने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या या चित्रपटात ट्विंकल खन्ना त्याची नायिका होती. या चित्रपटातील बॉबीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. बॉबीने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक हिट चित्रपट दिले. गुप्त, सोल्जर, हमराज यांसारखे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. पण नंतरच्या काळात त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसर आपटू लागले. त्याचे करियर संपले असेच सगळ्यांना वाटत होते. पण काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टर बॉईज या चित्रपटात त्याने त्याचा भाऊ सनी देओल आणि अभिनेता श्रेयस तळपदेसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. आता बॉबी रेस ३ या चित्रपटात झळकणार आहे.रेस ३ या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. बॉबी या चित्रपटात जी भूमिका साकारणार आहे त्या भूमिकेसाठी सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, इम्रान हाश्मी यांसारख्या अनेक कलाकारांना विचारण्यात आले होते. पण बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने या सगळ्यांनी रेस ३ मध्ये काम करण्यास नकार दिला. आज सलमानचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड असल्याने चित्रपटात सगळा भाव हा सलमानच खाऊन जाणार याची सगळ्या कलाकारांना कल्पना आहे. त्यामुळे अनेक अभिनेत्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला. त्यानंतर बॉबीला या चित्रपटासाठी विचारण्यात आले आणि त्याने देखील या चित्रपटात काम करण्यास लगेचच होकार दिला. सलमानने आता बॉबीसोबत चित्रीकरण करायला सुरुवात देखील केली आहे. सलमानने आपल्या या सहकलाकाराचे ढासळलेले करियर पुन्हा उभे करण्याचे ठरवले आहे. बॉबी एक चांगला कलाकार असल्याचे सलमानचे म्हणणे असल्याने सलमानच्या पुढील दोन चित्रपटात देखील सलमानने त्याला घेण्याचे ठरवले आहे. भारत या चित्रपटात सलमान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात देखील बॉबी एका भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच सलमानची निर्मिती असलेल्या लववात्री या चित्रपटात देखील बॉबीला घ्यायचे सलमानने ठरवले आहे. Also Read : ​बरसात नव्हे तर हा होता बॉबी देओलचा पहिला चित्रपट