Join us  

Bajrangi Bhaijaanमधील मुन्नीला या पुरस्काराने करण्यात आलं सन्मानित, समोर आले हर्षालीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 5:27 PM

‘बजरंगी भाईजान’ ( Bajrangi Bhaijaan ) या चित्रपटाचे नाव घेतले तरी एक चेहरा हमखास आठवतो. तो म्हणजे, चिमुकल्या मुन्नीचा.

‘बजरंगी भाईजान’ ( Bajrangi Bhaijaan ) या चित्रपटाचे नाव घेतले तरी एक चेहरा हमखास आठवतो. तो म्हणजे, चिमुकल्या मुन्नीचा. मुन्नीची भूमिका साकारली होती हर्षाली मल्होत्राने (Harshaali Malhotra).  बॉलिवूडचा दबंग सलमान खान(Salman Khan) सोबत स्क्रिन शेअर करणारी मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) ​​सोशल मीडियावर सक्रिय असते. हर्षाली इन्स्टा रील्सही बनवते. हर्षाली आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

'बजरंगी भाईजान' (Bajrangi Bhaijaan)  मधील मुन्नी (Munni) म्हणजेच हर्षाली मल्होत्रा ​​हिला महाराष्ट्र सरकार तर्फे प्रतिष्ठित 'भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार' (Bharat Ratna Dr. Ambedkar Award)ने सन्मानित केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat singh koshiyari) यांच्या हस्ते हर्षालीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हर्षालीने तिच्या सोशल मीडियावरून ही माहिती दिली. तिने लिहिले, 'भारतरत्न डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याचा अभिमान वाटतो. हर्षालीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हर्षाली मल्होत्राला पहिल्यांदाच पुरस्कार मिळालेला नाही. याआधी तिला 'बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट स्क्रीन अवॉर्ड, झी सिने बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्डही मिळाले आहेत. 

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगदरम्यान हर्षाली सतत रडायची. सलमानचा फायटिंग सीन वा इमोशनल सीन पाहिला की ती रडू लागायची. इतकेच नाही तर सलमान खानसोबत बोलतानाही ती प्रचंड लाजायची. पण हळूहळू दोघांतही चांगली मैत्री झाली होती. ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा करण्याआधी हर्षालीने कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :हर्षाली मल्होत्रासलमान खान