Join us  

एक बार जो मैंने कमिटमेंट... म्हणत सलमान खानने शेअर केली 'राधे' चित्रपटाची रिलीज डेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 1:18 PM

सलमानच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सलमानने सोशल मीडियाद्वारे जाहीर केली आहे.

ठळक मुद्देसलमानने नुकतेच 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, ईदचे कमिटमेंट होते आणि ईदलाच येणार...

'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या सलमान खानच्या चित्रपटाची त्याचे चाहते गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहात आहेत. आता सलमानच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सलमानने सोशल मीडियाद्वारे जाहीर केली आहे.

सलमानने नुकतेच 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, ईदचे कमिटमेंट होते आणि ईदलाच येणार... कारण मी एकदा कमिटमेंट केली... हा चित्रपट बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच 13 मे ला प्रदर्शित होणार आहे. 

'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' सलमान खानच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे काही चित्रीकरण शिल्लक होते. 2 ऑक्टोबरपासून सलमानने शूटिंगला पुन्हा सुरुवात केली होती. सलमानने एनडी स्टुडिओमध्ये राधेचे शूटिंग केले. त्यानंतर फायनल पॅचअप वर्क महबूब स्टुडिओमध्ये करण्यात आले. एक गाणं आणि क्लायमॅक्सचे चित्रीकरण सलमानने दहा दिवसांत पूर्ण केले होते. चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबरमध्ये संपल्यावर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 

'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सलमानने प्रदर्शनाची तारीख शेअर केल्यामुळे त्याच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. आम्ही या चित्रपटाची वाट पाहात आहोत असे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

टॅग्स :सलमान खान