Join us  

राधे हा ग्रेट चित्रपट नक्कीच नाही असे म्हणत सलीम खान यांनी व्यक्त केली नाराजी, वाचा त्यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 3:47 PM

सलमानच्या चाहत्यांनंतर त्याच्या वडिलांनी राधे - योर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देईदच्या निमित्ताने गेल्या 13 मे रोजी सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाईजान’ रिलीज झाला.

बॉलिवूड स्टार सलमान खानचा (Salman Khan) ‘राधे - योर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe Your Most Wanted Bhai) हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीज झालाये. अर्थात चित्रपटगृहांत नाही तर ओटीटीवर.भाईजानच्या चाहत्यांच्या या सिनेमावर सुरुवातीला उड्या पडल्या. पण प्रेक्षकांना हा चित्रपट काही तितकासा आवडलेला नाहीये. हा चित्रपट पाहून सलमानच्या चाहत्यांची निराशा झाली असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. 

आता सलमानच्या चाहत्यांनंतर त्याच्या वडिलांनी या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सलमानचे वडील सलीम खान यांनी म्हटले आहे की, राधे हा चांगला चित्रपट नाहीये... दबंग 3 हा खूप वेगळा चित्रपट होता. बजरंगी भाईजान खूप वेगळा आणि चांगला  चित्रपट होता. राधे चित्रपट तसा नाहीये. कमर्शिअल चित्रपटाद्वारे सगळ्यांना पैसा मिळाला पाहिजे. राधे या चित्रपटात सलमानने चांगले काम केले आहे. या चित्रपटावर ज्यांनी पैसा लावला आहे, त्यांना फायदा होत आहे. पण राधे हा ग्रेट चित्रपट नक्कीच नाही. 

ईदच्या निमित्ताने गेल्या 13 मे रोजी सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाईजान’ रिलीज झाला. मात्र यादरम्यान काहींनी बेकायदेशीररित्या सिनेमाची पायरसी केली. यामुळे सलमान चांगलाच संतापला होता. प्रेक्षकांनी ‘राधे’ प्रेक्षकांनी योग्य प्लॅटफॉर्मवर सिनेमा पहावा अशी विनंती केली सलमानने आधीच केली होती. मात्र त्यानंतरही अनेक प्रेक्षकांनी बेकायदेशीर रित्या काही वेबसाईटवर उपलब्ध असलेला सिनेमा पाहिल्याने सलमान संतापला होता. पायरसीचा भाग बनू नका़ नाहीतर सायबर सेल तुमच्यावर कारवाई करेल, तुम्ही अडचणीत याल, अशी ताकीदच त्याने दिली होती.

टॅग्स :सलमान खानराधेसलीम खान