Join us  

डोळ्यात काजळ, कानात बाली, इब्राहिम अली खानच्या फोटोने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 1:10 PM

इब्राहिमच्या फोटोवर सबानेही कमेंट करत पसंती दिली आहे. इब्राहिम हा हुबेहुब सैफ अली खानसारखाच दिसतो. त्यामुळे त्याचे फोटो पाहून अनेकांना तरुण वयात सैफ अली खान असाच दिसायचा अशा कमेंटही चाहते करत असतात.

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. बर्‍याच दिवसांपासून त्याच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे पण सिनेमात येण्यापूर्वीच त्याची चांगली फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर तो खूप एक्टीव्ह असतो. त्याचे प्रत्येक फोटो व्हिडीओ तो शेअर करत असतो. लाइमलाइटपासून दूर असलेली सैफ अली खानची बहीण सबा अली खान सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती कधी तिच्या आईवडिलांचा तर कधी तिच्या लहान बहिणीचा फोटो शेअर करत असते. सबाने इब्राहिम अली खान आणि तैमूर अली खानबद्दल नेहमीच प्रेम व्यक्त करत असताना यापूर्वीही पाहायला मिळाले आहे.

सोशल मीडियावर इब्राहिम अली खानने काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटच्या माध्यमातून त्याचा एक वेगळाच अंदाज समोर आला आहे. डोळ्यात भरपूर काजळ, कानात बाळी आणि शेरवानी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी कधीच इब्राहिमने असे फोटोशूट केले नव्हते. त्यामुळे असा काहीसा त्याचा अंदाज पहिल्यांदाच समोर आला आहे. 

 

इब्राहिमच्या फोटोवर सबानेही कमेंट करत पसंती दिली आहे. इब्राहिम हा हुबेहुब सैफ अली खानसारखाच दिसतो. त्यामुळे त्याचे फोटो पाहून अनेकांना तरुण वयात सैफ अली खान असाच दिसायचा अशा कमेंटही चाहते करत असतात.

इब्राहिमच्या फिल्म करिअरबाबत सैफने केला खुलासा, म्हणाला - तो आता तयार आहे...

सैफ अली खान काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान म्हणाला होता, त्याची नेहमीच इच्छा होती की त्याचा मुलगा इब्राहिमने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करावी. त्याची सारा आणि इब्राहिम या दोघांनी अभिनय क्षेत्रात काम करावे ही इच्छा होती. सैफ म्हणाला की, त्याची इच्छा आहे त्याच्या प्रत्येक मुलाने बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवावं. मुलगी सारा अली खान आधीच बॉलिवूडमध्ये काम करत आहे. आणि तिचे 'केदारनाथ', 'सिंबा' आणि 'लव्ह आज काल' हे ' कुली नं १'  सिनेमे आले आहेत.

लहान मुलगा तैमूर सोशल मीडियावर चांगलाच पॉप्युलर आहे.सैफ अली खानचं म्हणणं आहे की, त्याला इब्राहिमला हाच सल्ला द्यायचा आहे की, त्याने मेहनत करावी आणि योग्य सिनेमांची निवड करावी. सैफ म्हणाला की, जग फार बदललं आहे आणि स्वत:ला सिद्ध करणं, आपली जागा निर्माण करणं आधीपेक्षा खूप कठिण झालं आहे.

टॅग्स :इब्राहिम अली खानसैफ अली खान