Join us  

बॉलिवूडमधील लेखकाने केले ट्वीट... म्हटले, सगळी चूक ही नेहरू आणि गांधी यांची आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 12:54 PM

लेखक वरुण ग्रोव्हरच्या ट्वीटने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ठळक मुद्देवरुण ग्रोव्हरने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सगळी चूक ही नेहरू आणि गांधी यांची आहे. देशाला आज स्वातंत्र्य मिळाले नसते तर प्रजासत्ताक  दिवस देखील नसता...

काल भारताचा प्रजासत्ताक दिन होता. पण काल दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. याची चर्चा सध्या सगळीकडेच रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील एका लेखकाने केलेले ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लेखक वरुण ग्रोव्हरच्या ट्वीटने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्वीटचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

वरुण ग्रोव्हरने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सगळी चूक ही नेहरू आणि गांधी यांची आहे. देशाला आज स्वातंत्र्य मिळाले नसते तर प्रजासत्ताक दिवस देखील नसता... त्याच्या या ट्वीटला आतापर्यंत २८ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे तर चार हजाराहून अधिक यावर रिप्लाय आले आहेत आणि पाच हजाराहून अधिक लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केले आहे. 

काल देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच भारताची राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला आणि शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली पार हादरून गेली होती. नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकावला होता. 

गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र आंदोलक शेतकरी आणि पोलीस काही ठिकाणी आमने-सामने आले होते आणि शेतकरी आंदोलन चिघळले. दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. या आंदोलनादरम्यान दिल्लीतील आयकर कार्यालयाजवळ (ITO) एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

वरुण ग्रोवरने नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’ची पटकथा लिहिली आहे.  तसेच त्याने फॅन, उडता पंजाब, सोनचिडिया या चित्रपटांतील काही गाणी लिहिली आहेत. वरुण नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांवर सोशल मीडियाद्वारे आपले मत व्यक्त करत असतो.

टॅग्स :शेतकरी संप