Join us  

सचिनच्या लेकीची चर्चा भारी! सारा तेंडुलकरचा हा लुक पाहून बॉलिवूडच्या अभिनेत्रींना विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 2:31 PM

Sara Tendulkar : सोशल मीडियावर याच फोटोंची चर्चा, पाहा तर..

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सारा एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची खमंग चर्चा रंगली होती.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) एकुलती एक लाडकी लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सध्या जाम चर्चेत आहे. सचिनने देशविदेशातील जवळपास प्रत्येक स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला, प्रत्येक गोलंदाजाला धूळ चारली. आता त्याची लेक सारा फॅशनच्या बाबतीत बॉलिवूडच्या बड्या बड्या अभिनेत्रींना मात देताना दिसतेय.

साराने वर्कआऊट लुकचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. सचिनची लेक म्हणून सारा तशीही चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांची नजर असते. साहजिकच तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. सिंगर कनिका कपूर व जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ यांनी फायर इमोजी पोस्ट करून तिच्या या फोटोंना दाद दिली आहे.लाईमलाईटपासून दूर असलेली सारा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. 13 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेल्या साराचा फॅशन सेन्स अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. ताज्या फोटोंमध्ये त्याची झलक तुम्हाला पाहायला मिळेल.

 मध्यंतरी ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. तूर्तास तरी साराच्या करिअरची दिशा स्पष्ट नाही. 23 वर्षांची सारा सध्या लंडनमध्ये शिकते आहे.काही दिवसांपूर्वी सारा एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची खमंग चर्चा रंगली होती. होय, कोलकाताचा दमदार फलंदाज व टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आणि सारा हे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले गेले होते.

दोघांनी एकाच वेळी I SPY असे कॅप्शन लिहून आपापले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. काही महिन्यांपूर्वी गुगल या सर्च इंजिनवर शुबमन गिलची पत्नी म्हणून सारा तेंडुलकर हिचे नाव झळकले होते. अर्थात WTC फायनलपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शुबमनने आपण सिंगल असल्याचे सांगून या चर्चांना पूर्णविराम लावला होता.  शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतात. इतकंच नव्हे तर एकमेकांच्या पोस्टला लाईक्स व इमोजीही पोस्ट करतात. साराने अनेकदा इंस्टा स्टोरीवर शुबमन खेळतानाच फोटो पोस्ट केले आहेत.

टॅग्स :सारा तेंडुलकरसचिन तेंडुलकर