Join us  

जान्हवी कपूर पडली 'या' अभिनेत्याच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 2:47 PM

जान्हवी कपूर एका अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना ऊत आले आहे.

ठळक मुद्देजान्हवी आणि कार्तिकचे हे फोटो गोव्यावरून परततानाचे असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघे गोव्याला कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते की फिरायला याबाबत अद्याप तरी काहीही स्पष्ट झालेले नाही.

बॉलिवूडमध्ये अफेअरच्या आणि ब्रेकअपच्या बातम्या आपल्याला नेहमीच वाचायला मिळतात. आता अभिनेत्री जान्हवी कपूर एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली असल्याच्या चर्चांना ऊत आले आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवरून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कार्तिक आर्यनने काही दिवसांपूर्वी त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. अशी असते आंतरिक शांतता असे म्हणत त्याने त्याचा एक खूप छान फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर जान्हवीने कमेंट केली होती. तेव्हापासूनच दाल में कुछ काला है असे म्हटले जात होते. पण आता तर त्यांना एअरपोर्टवर एकत्र पाहाण्यात आले आहे. या फोटोमुळे तर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. एअरपोर्टवरील या फोटोंमध्ये त्या दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. जान्हवी आणि कार्तिकचे हे फोटो गोव्यावरून परततानाचे असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघे गोव्याला कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते की फिरायला याबाबत अद्याप तरी काहीही स्पष्ट झालेले नाही. त्या दोघांनीही या चर्चांबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. 

जान्हवीने धडक या चित्रपटाद्वारे तिच्या करियरची सुरुवात केली. या चित्रपटात इशान खट्टरसोबत तिची जोडी जमली होती. तिचा गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

सोनू की टीटू की स्वीटी आणि लुका छुपी या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. लव्ह आज कल २ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. त्याच्याकडे गेल्या काही काळात चांगल्या सिनेमांच्या ऑफर्स येत आहेत. कार्तिकने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख स्वतःच्या हिमतीवर बनवली आहे. त्याचा इंडस्ट्रीत कुणीही गॉडफादर नाही. त्यामुळे त्याला सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल करावा लागला होता.

टॅग्स :जान्हवी कपूर