Join us  

अनुपम खेर यांच्या गाजलेल्या भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 8:42 AM

बॉलिवूडचे हरहुन्नरी अभिनेते अनुपम खेर यांचा आज (७ मार्च) वाढदिवस. शिमला येथे ७ मार्च १९५५ रोजी अनुपम यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्याला अभिनयचं करायचा, हे अनुपम यांनी पक्के ठरवले होते. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथील शिक्षण पूर्ण करत १९७८ मध्ये अनुपम यांनी रंगमंचावर पदार्पण केले. रंगमंच गाजवत असतानाचं बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि या स्वप्नाचा पाठपुरावा करत, ते मुंबईला आले. पण स्वप्नांच्या या नगरीत त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. १९८२ साली ‘आगमन’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली खरी, पण, हा सिनेमा पुरता अयशस्वी ठरला. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८४ साली अनुपम यांना महेश ‘सारांश’ हा सिनेमा मिळाला अन् अनुपम यांनी या संधीचे सोने केले. या चित्रपटानंतर त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत, जाणून घेऊया त्यांच्या गाजलेल्या भूमिका...

बॉलिवूडचे हरहुन्नरी अभिनेते अनुपम खेर यांचा आज (७ मार्च) वाढदिवस. शिमला येथे ७ मार्च १९५५ रोजी अनुपम यांचा जन्म झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्याला अभिनयचं करायचा, हे अनुपम यांनी पक्के ठरवले होते. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथील शिक्षण पूर्ण करत १९७८ मध्ये अनुपम यांनी रंगमंचावर पदार्पण केले. रंगमंच गाजवत असतानाचं बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि या स्वप्नाचा पाठपुरावा करत, ते मुंबईला आले. पण स्वप्नांच्या या नगरीत त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. १९८२ साली ‘आगमन’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली खरी, पण, हा सिनेमा पुरता अयशस्वी ठरला. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८४ साली अनुपम यांना महेश ‘सारांश’ हा सिनेमा मिळाला अन् अनुपम यांनी या संधीचे सोने केले. या चित्रपटानंतर त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत, जाणून घेऊया त्यांच्या गाजलेल्या भूमिका... सारांशराम लखनदिलवाले दुल्हनिया ले जायेंगेदिलदिल है के मानता नहीवेन्सडेकुछ कुछ होता हैस्पेशल २६हमकर्मा