Join us

त्या चित्रपटातील बलात्काराच्या दृश्यामुळे कित्येक दिवस झोपली नाही रितूपर्णा सेन गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 12:31 IST

कलाकार आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. अनेक वेळा ते चित्रपटात, आपल्या व्यक्तिरेखेत एवढे गुंतून ...

कलाकार आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. अनेक वेळा ते चित्रपटात, आपल्या व्यक्तिरेखेत एवढे गुंतून जातात की, त्या व्यक्तिरेखेतून बाहेर पडणे त्यांना खूपच कठीण जाते. अनेक व्यक्तिरेखा त्यांच्या आय़ुष्यावर खूप चांगला प्रभाव देखील टाकतात. रितूपर्णा सेन गुप्ता ही खूप चांगली अभिनेत्री असून तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. प्राक्तन, अलिक सुख, आलाप, जियो काका यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. रितूपर्णाला तिच्या भूमिकेसाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिला दहन या तिच्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात देखील आले आहे. तिच्या एका चित्रपटातील एक सीन काहीही केल्या तिच्या आठवणीतून जात नाहीये. तो सीन आठवून मी अनेकवेळा घाबरून उठते असे तिने अनेक मुलाखतीत सांगितले आहे. रितूपर्णाने शेत पाथोर या तिच्या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिसरा कौन या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. मित्तल वर्सेस मित्तल या चित्रपटातील रितूपर्णाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण काही केल्या हा चित्रपट ती विसरूच शकत नाहीये. या चित्रपटात तिच्यावर बलात्कार होतो असे एक दृश्य होते. या दृश्याची आजही रितूपर्णाला आठवण आली तर ती घाबरून उठते. या चित्रपटातील दृश्यात अभिनेता रोहित रॉय तिच्यावर बलात्कार करतो असे एक दृश्य होते. हे दृश्य चित्रीत करत असताना खरे तर या चित्रपटाच्या टीमला थोडेसे टेन्शन आले होते. हा सीन कशाप्रकारे चित्रीत होईल असे त्यांना वाटत होते. पण अॅक्शन म्हटल्यावर रितूपर्णाने खूपच चांगला अभिनय केला आणि पहिल्याच शॉर्टमध्ये हा सीन ओके झाला. पण या दृश्याचा रितूपर्णावर इतका प्रभाव पडला की, तिने डोळे मिटल्यावर हेच दृश्य तिच्या डोळ्यासमोर यायचे. त्यामुळे तिला झोप देखील येत नव्हती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, ते बलात्काराचे दृश्य कित्येक दिवस मला माझ्या स्वप्नात दिसायचे. मला त्यामुळे झोपच यायची नाही. केवळ त्या दृश्याचा विचार जरी केला तरी मी घामाघूम व्हायची.