Join us  

'भर रस्त्यात हाणलं पाहिजे’; औषधांचा काळाबाजार करणार्‍यांवर भडकला रितेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 5:19 PM

.कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात सर्रास काळाबाजार सुरु आहे.

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. आॅक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय .कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात सर्रास काळाबाजार सुरु आहे. ही सर्व परिस्थिती पाहून अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh)  चिडला  आहे. कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन काही जण रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत.

रितेश देशमुळे सोशल मीडिया सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो वेळोवेळी देशात सुरु असणाऱ्या अनेक मुद्द्यांवर किंवा परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया देत असतो. आता त्याने  त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट रिट्वीट केले आहे. ‘औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’, असे ट्वीट रितेशने केले आहे.  बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. 

नागपुरमध्ये एका कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर  इंजेक्शनऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन देण्यात आले होते. हे पाहून रितेश देशमुख चांगलाच संतापल आणि त्याने ट्विट करत आपल्या संपात व्यक्त केला.   

टॅग्स :रितेश देशमुखरेमडेसिवीर