ऋषि कपूरने केले गणपती विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 20:59 IST
बॉलिवूडचे अनेक स्टार आजघडीला गणपतीच्या भक्तीमध्ये दंग झालेले आहेत. ९ सप्टेंबरला अभिनेता ऋषि कपूरने ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचे ...
ऋषि कपूरने केले गणपती विसर्जन
बॉलिवूडचे अनेक स्टार आजघडीला गणपतीच्या भक्तीमध्ये दंग झालेले आहेत. ९ सप्टेंबरला अभिनेता ऋषि कपूरने ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचे विसर्जन केले. यावेळी त्याची पत्नी नीतू, मुलगी रिद्धिमा व नात समायरा यांची उपस्थिती होती. संपूर्ण धार्मिक विधी करुन, त्यांनी बाप्पाचे विसर्जन केले. ऋषि कपूरसह विवेक ओबेरॉयनेही बाप्पाचे मोठ्या धामधूमीत विसर्जन केले. तसेच सोफी चौधरी, उर्वशी रौतेला, सोहा अली खान हे सुद्धा मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पाच्या भक्तीत दंग झाले आहेत.