Join us  

चाहत्याने केली प्रशंसा आणि बदल्यात ऋषी कपूर यांनी केले ट्रोल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 9:22 PM

अलीकडे एका चाहत्याने ऋषी कपूर यांना ट्विट करून ‘मुल्क’ची भरभरून प्रशंसा केली. ऋषी कपूर यांचा हा चाहता पेशाने वकील आहे.

ऋषी कपूर स्टारर ‘मुल्क’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाचं भावला. अतिशय प्रासंगिक आणि सामाजिक मुद्यावर बनलेल्या या चित्रपटाला समीक्षकांनीही दाद दिली. त्यामुळेच रिलीजच्या अनेक आठवड्यानंतरही लोक हा चित्रपट बघत असून त्याचे कौतुक करत आहेत. अलीकडे एका चाहत्याने ऋषी कपूर यांना ट्विट करून ‘मुल्क’ची भरभरून प्रशंसा केली. ऋषी कपूर यांचा हा चाहता पेशाने वकील आहे. इतक्या ज्वलंत आणि सामाजिक मुद्यावर चित्रपट बनवल्याबदद्ल त्याने ऋषी कपूर यांचे आभार मानले. पण त्याबदल्यात ऋषी यांनी मात्र आपल्या पेशाने वकील असलेल्या चाहत्याला इंग्रजी सुधारण्याचा सल्ला दिला.

 होय, ‘धन्यवाद सर, पण तुम्ही वकील असूनही तुमची इंग्रजी भाषा, व्याकरण, स्पेलिंग इतके खराब का? तुम्हाला काय म्हणायचे आहे, मला कळलेले नाही. तुम्ही काळजी घ्यायला हवी,’ असे प्रत्युत्तरादाखल ऋषी कपूर यांनी लिहिले. अर्थात काही तासांत हे ट्विट डिलिट करण्यात आले. पण तोपर्यंत ते व्हायरल झाले होते.‘मुल्क’मध्ये ऋषी कपूर, तापसी पन्नू, आशुतोष राणा, रजत कपूर, मनोज पाहवा व प्रतिक बब्बर अशी तगडी स्टारकास्ट होती.

 

टॅग्स :ऋषी कपूर