Join us  

Birthday Special : अन् राजेश खन्ना यांनी समुद्रात फेकली ऋषी कपूर यांची अंगठी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 8:00 AM

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस. ‘बॉबी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणा-या ऋषी यांचे आयुष्य अनेक रंजक गोष्टींनी भरलेले आहे.

ठळक मुद्दे ‘कर्ज’ फ्लॉप झाल्यानंतर  ऋषी कपूर डिप्रेशनमध्ये गेले होते.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस. सध्या ऋषी कपूर अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत आहेत. ‘बॉबी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणा-या ऋषी यांचे आयुष्य अनेक रंजक गोष्टींनी भरलेले आहे. ‘खुल्लम खुल्ला- ऋषी कपूर अनसेन्सर्ड’ या आपल्या बायोग्राफीत त्यांनी अनेक रंजक खुलासे केलेत. यातील पाच रंजक खुलासे तुम्हालाही अवाक करतील...

नीतू सिंग नव्हते पहिले प्रेम

या बायोग्राफीत ऋषी यांनी स्वत:च्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. नीतू सिंग यांच्यापूर्वी यास्मीन मेहता नावाच्या ते डेट करत होते. नीतूला भेटलो तेव्हा मी यास्मिनला डेट करत होतो, अशी कबुली त्यांनी दिली होती.  यास्मिन ही पारशी होती.  1973 मध्ये ‘बॉबी’ रिलीज झाला आणि ऋषी व डिंपल कपाडियाच्या रोमान्सच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चा यास्मिनने मनावर घेतल्या आणि ऋषी कपूर यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.  ऋषी यांनी जास्मीनशी पुन्हा नाते जुळावे यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ती राजी झाली नाही.

राजेश खन्ना यांनी समुद्रात फेकली ऋषी कपूर यांची अंगठी

 यास्मीनने ऋषी कपूर यांना एक अंगठी दिली होती. ‘बॉबी’चे शुटिंग सुरू असताना डिंपल कपाडियाने ती अंगठी ऋषी यांच्या बोटातून काढली आणि स्वत: घालून घेतली होती. पुढे राजेश खन्ना यांनी डिंपलला प्रपोज केले त्यावेळी त्यांनी तिच्या बोटातील ही अंगठी पाहिली. त्यांनी डिंपलच्या बोटातील ती अंगठी काढली आणि जुहूतील  समुद्रात फेकून दिली.  राजेश खन्नाने ऋषी कपूरची अंगठी समुद्रात फेकून दिली, ही त्यावेळी हेडलाईन बनली होती.  ऋषी यांच्या यांनी पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, त्यांनी कधीही डिंपलवर प्रेम केले नाही किंवा ते कधीही तिच्याकडे आकर्षितही झाले नाही. 

खरेदी केला होता अवार्ड

आपल्या बायोग्राफीत ऋषी कपूर यांनी एक धक्कादायक खुलासा केला होता. तो म्हणजे, 30 हजार रूपये देऊन ‘बॉबी’साठी फिल्मफेअर अवार्ड खरेदी केल्याचा. 1973 मध्ये अमिताभ बच्चन ‘जंजीर’साठी नॉमिनेट होते. ऋषी कपूर अमिताभ यांना आपला प्रतिस्पर्धी मानत. त्यामुळे त्यांनी 30 हजार रूपये घेऊन बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार स्वत: मिळवला. ऋषींच्या मते,अमिताभ व त्यांच्या नात्यात यामुळेच दुरावा आला होता. कारण हा अवार्ड आपल्याला मिळायला हवा होता, असे अमिताभ यांना वाटत होते.

जवळजवळ नाकारला होता ‘कभी-कभी’

ऋषी कपूर यांचा ‘कभी-कभी’ हा सिनेमा मोठा हिट ठरला. पण हा सिनेमा त्यांनी जवळपास नाकारलाच होता. याची दोन कारणे होती. पहिले म्हणजे, यात  नीतू यांची भूमिका त्यांच्यापेक्षा अधिक महत्त्वाची होती. दुसरे म्हणजे, त्यांना अमिताभ यांना आव्हान द्यायचे होते. 

संजय दत्त पोहोचला होता मारायला

एकदा संजय दत्त ऋषी कपूर यांना मारायला त्यांच्या घरी पोहोचला होता. ऋषी कपूर व टीना मुनीम यांचे अफेअर सुरु आहे, असे संजयला वाटत होते. त्यामुळेच तो संजयला मारायला पोहोचला होता. पण नीतू यांनी समजवल्यानंतर तो माघारी फिरला होता. 

डिप्रेशनसाठी ठरवले होते लग्नाला जबाबदार

 ‘कर्ज’ फ्लॉप झाल्यानंतर  ऋषी कपूर डिप्रेशनमध्ये गेले होते.  हा सिनेमा रिलीज व्हायच्या पाच महिन्यांपूर्वी त्यांनी नीतू यांच्याशी लग्न केले होते. त्यामुळे अपयशाचे खापर ते लग्नावर फोडू लागले होते. अर्थात त्यानंतर प्रेम रोग  आणि  नसीब हे दोन चित्रपट हिट झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास परतला होता.

टॅग्स :ऋषी कपूर