Join us  

बॉलिवूड स्टार्सचा उदय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM

नववषार्चे स्वागतपरिश्रमाला पर्याय नाही म्हणतात. खरचं आहे ते. बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगातील झगमगणाऱ्या  स्टार्सलाही हे यश काही बसल्या ठिकाणावर ...

नववषार्चे स्वागतपरिश्रमाला पर्याय नाही म्हणतात. खरचं आहे ते. बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगातील झगमगणाऱ्या  स्टार्सलाही हे यश काही बसल्या ठिकाणावर मिळाले नाही. आज जरी ते राजेशाही थाटात जगत असले तरी त्यांना हे स्थान मिळविण्यासाठी अथक परिश्रम करावेच लागले. स्ट्रगलच्या या काळात ते अनेक पडले, अडखळले. पण, आत्मविश्‍वासाच्या बळावर पुन्हा समोर दिसणार्‍या आव्हानांना थेट भिडले. यात जसे महानायक अमिताभ बच्चन होते तसेच स्वत:ला 'काला कलुटा' म्हणणारा नवाझुद्दीन सिद्दीकीही होता. स्वत:च स्वत:च्या जीवनाचे शील्पकार झालेल्या स्टार्सचही ही यशोगाथा. सकारात्मक व उमेद निर्माण करणारी खास मालिका आम्ही येत्या काही दिवसांत सीएनएक्समध्ये सादर करणार आहोत.अमिताभ बच्चनआज आपण अमिताभ बच्चन यांच्यासाठी 'लिजेंड' हा शब्द वापरतो. कारण त्यांची तुलना अन्य कलावंताशी होऊच शकत नाही. त्यांची पर्सनॅलिटी देखील आगळीवेगळी आहे. त्याहून वेगळा त्यांचा आवाज असून ती त्यांची ओळख झालीआहे. मात्र आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी आॅल इंडिया रेडिओमध्ये नोकरीसाठी मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांचा आवाज मोठा व कर्कश असल्याचे सांगण्यात आले होते. मात्रयाच आवाजाच्या भरवशावर त्यांनीबॉलिवूड जिंकले.माधुरी दीक्षित'धक धक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितच्या स्ट्रगलबद्दल फारसे कुणी लिहले नाही. तिने सुरुवातीच्या दिवसांत फार मेहनत घेतली. तिचे गुडघे यामुळे कमजोर झाले होते, असेही सांगितले जाते. ती आजही आपल्या त्या दिवसांची आठवण झाल्यावर खूप हसते. आपल्या अभिनयाने तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.कंगणा रानौतहिमाचलच्या या सौंदर्यवतीने इमरान हाशमीच्या 'गँगस्टर' या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिच्या दिसण्यावर व फॅशन ट्रेन्डबद्दल तिच्यावर कठोर टीका करण्यात आली. मात्र या सर्व गोष्टीनंतरही तिने आपला ध्यास सोडला नाही. आपली खरी ताकद हीच असल्याची जाणीव तिने करून दाखविली. याचमुळे ती बॉलिवूडची नवी 'क्वीन' झाली.इरफान खानया काळातील एक 'टॅलेंटेड अँक्टर' म्हणून इरफान खानची ओळख आहे. सुरुवातीच्या काळात त्याला दिग्दर्शकांकडून मानधनही मिळत नव्हते. त्या लायकीचा नाही असेही इरफानला सांगण्यात आले होते. मात्र त्याने आपले अभिनय सार्मथ्य सिद्ध करून दाखवले. सध्या अनेक असाईनमेंटमध्ये तो चांगलाच व्यस्त असून चांगली कमाई करणारा स्टार ठरला आहे.दीपिका पदुकोण'मिस लाँग लेंग्जस'् अशी उपाधी तिला देण्यात येते. सध्या ही बॉलिवूड दिवा आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. नुकतेच तिने एका मुलाखती दरम्यान एक धक्कादायक गोष्ट सांगितली. तिचा चेहरा आकर्षक नाही, असे सांगत एकाने तिला चक्क प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता, याकडे तिने लक्ष वेधले. मात्र मी त्याचा सल्ला मनावर घेतला नाही आणि आज येथे आहे, हेही तिने मोठया अभिमानाने सांगितले.नवाझुद्दीन सिद्दीकीतो स्वत:ला 'काला कलुटा' म्हणतो. बॉलिवूडमध्ये हिरो म्हणून असणारी पर्सनॅलिटी त्याच्यात नाही. त्याला क्रिटीक्सकडून मिळणारे प्रशस्ती पत्र म्हणजे 'ये क्या हिरो बनेंगा' असेच होते. मात्र त्याने अभिनयाच्या बळावर या सर्व गोष्टींवर मात करून स्वत:चे विशेष स्थान तयार केले आहे. आता त्याचा बॉलिवूडमध्ये स्वीकार झाल्यावर 'इसने तो कर दिखाया' अशा शब्दात त्याचे कौतुक केले जात आहे.