Join us

‘द रिंग’च्या शूटींगचा व्हिडिओ लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 19:28 IST

प्रागमध्ये ‘द रिंग’ या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. त्याचे काही फोटो तुम्ही पाहिले आहेतच. मात्र आता शूटींगचा एक व्हिडिओ लीक झाला आहे.

शाहरूख खान इम्तियाज अलीच्या ‘द रिंग’ या चित्रपटात सध्या बिझी आहे. या चित्रपटात शाहरूखच्या अपोझिट आहे ती अनुष्का शर्मा. प्रागमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. त्याचे काही फोटो तुम्ही पाहिले आहेतच. मात्र आता शूटींगचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. यात शाहरूख, अनुष्का व इम्तियाज असे तिघेही सेटवर आहेत. रेड स्केटर ड्रेस, बांबर जॅकेट आणि बूट अशा स्टाईलिश लूकमध्ये अनुष्का यात दिसते आहे.  अनुष्का वेगाने कॅमेºयाकडे येत आहे आणि शाहरूख तिच्या मागे येताना या सीनमध्ये  दिसतो आहे. ‘द रिंग’ हा इम्तियाजसोबतचा शाहरूखचा पहिला चित्रपट आहे. याऊलट अनुष्का व शाहरूखचा एकत्र असा हा तिसरा चित्रपट आहे. अनुष्काने शाहरूखसोबत ‘रब ने बना दी जोडी’मधून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर दोघेही ‘जब तक है जां’मध्ये एकत्र दिसले. अर्थात या चित्रपटात कॅटरिना फीमेल लीडमध्ये होती.