Join us  

‘ तिचे फिल्मी करिअर आता संपले...’; दिग्दर्शकाने रिया चक्रवर्तीला सिनेमातून काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:02 PM

दिग्दर्शक लोम हर्ष हे रिया चक्रवर्तीसोबत एक सिनेमा बनवणार होते. मात्र आता हर्ष यांनी रियासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये बोटावर मोजण्याइतके सिनेमे केलेत. त्यातही सर्वच्या सर्व फ्लॉप.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, फसवणूक, पैशांची अफरातफर अशा अनेक आरोपांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडी सुद्धा रियाविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने तपास करत आहे. एकंदर या प्रकरणात रिया चहूबाजुंनी वेढलेली दिसतेय. केवळ इतकेच नाही तर आता रियाचे फिल्मी करिअर संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रियाला एक सिनेमा हातचा गमवावा लागला आहे.

दिग्दर्शक लोम हर्ष हे रिया चक्रवर्तीसोबत एक सिनेमा बनवणार होते. मात्र आता हर्ष यांनी रियासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपब्लिक या चॅनलवर खुद्द लोम हर्ष यांनी हा खुलासा केला. ‘रियासोबत मी एका सिनेमाचे प्लानिंग करत होतो. पण आता मी तिच्यासोबत काम करणार नाही,’ असे लोम हर्ष म्हणाले.रिया चक्रवर्तीचे फिल्मी करिअर आता संपले आहे. सुशांत प्रकरणात काही लोकांच्या नावाचा खुलासा न करून आपण आपले करिअर वाचवू शकतो, असा तिचा समज असेल तर ते खोटे आहे. प्रेक्षक तिला कधीही स्वीकारणार नाही. तिचा खेळ आता संपलाय. आता ती वाचणार नाही. सुशांतवर खरे प्रेम असते तर ती स्वत:हून समोर येत बोलली असती, असे लोम हर्ष म्हणाले.

रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये बोटावर मोजण्याइतके सिनेमे केलेत. त्यातही सर्वच्या सर्व फ्लॉप. तरीही तिच्याकडे कोट्यावधी रूपयांची संपत्ती आहे.   रियाचे वडील आर्मीत डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी. तिला एक भाऊ असून त्याचे नाव शेविक आहे. या चौघांवरही सुशांतप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणुकीचा आरोप आहे.   2009 मध्ये एमटीव्हीच्या ‘टीन दीवा’ या रिअ‍ॅलिटी शेमध्ये ती फर्स्ट रनर अप होती. यानंतर तिने दिल्लीत एमटीव्हीच्या व्हिडीओ जॉकी बनण्यासाठी आॅडिशन दिले आणि पाठोपाठ सिलेक्टही झाली.  व्हीजे म्हणून तिने कॉलेज बीट, टिकटॅक सारखे प्रोग्राम होस्ट केलेत. टीव्ही प्रोग्राम होस्ट केल्यानंतर रियाला अ‍ॅक्टिंग करिअर खुणावू लागले.  

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत