Join us  

Remembering SSR : सुशांत सिंग रजपूतमध्ये उरली नव्हती जगण्याची इच्छा, त्यानेच निधनाच्या काही महिन्यांपूर्वी दिली होती कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 1:06 PM

सुशांतच्या निधनानंतर त्याच्या तब्येतीविषयी अनेक गोष्टींचा उलगडा झाला होता. त्याच्या निधनाच्या काही महिने आधी म्हणचेच 27 नोव्हेंबर 2019 ला हिंदुजा हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये सुशांतला दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देसुशांतच्या निधनानंतर मीडियाशी बोलताना त्याच्या डॉक्टरने सांगितले होते की,  सुशांतच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार असल्याचे त्याने कधीही सांगितले नव्हते.

काही तारखा कधीच विसरता येत नाहीत. बॉलिवूडप्रेमींसाठी 14 जून ही तारीख यापैकीच एक. आजची ही तारीख बॉलिवूडप्रेमींना एक भळभळती जखम देऊन गेली होती. गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) जगाला अलविदा म्हटले होते. शून्यातून विश्व निर्माण करणारा सुशांत अचानक जग सोडून निघून गेला होता. (Sushant Singh Rajput Death Anniversary) कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणा-या सुशांतने काळासोबत लीड अ‍ॅक्टरपर्यंतचा पल्ला गाठला. आज सुशांतचा पहिला स्मृतीदिन.

सुशांतच्या निधनानंतर त्याच्या तब्येतीविषयी अनेक गोष्टींचा उलगडा झाला होता. त्याच्या निधनाच्या काही महिने आधी म्हणचेच 27 नोव्हेंबर 2019 ला हिंदुजा हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये सुशांतला दाखल करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी डॉक्टरांनी सुशांतची तपासणी केली होती आणि त्यादरम्यान त्याने डॉक्टरांना सांगितले होते की तो डिप्रेशनमध्ये आहे. त्याला झोप येत नाही, भूक लागत नाही, आयुष्यात काहीही करावेसे वाटत नाही, आता जगण्याची इच्छाच उरली नाही अशी कबुली त्याने दिली होती. त्यानंतर 30 नोव्हेंबरला सुशांतला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

सुशांतच्या निधनानंतर मीडियाशी बोलताना त्याच्या डॉक्टरने सांगितले होते की,  सुशांतच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार असल्याचे त्याने कधीही सांगितले नव्हते. पण त्याची अवस्था पाहून दिसत होते की तो अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहे. सुशांतला वाटत होते की आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत. त्याला असुरक्षित वाटायचे. पण यामागचे कारण मनातील नकारात्मक विचारसरणी होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत