Join us  

आमिर खानच्या भावाची अशी झाली अवस्था,आता दिसतोय असा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 10:57 AM

'कयामत से कयामत तक' आणि 'जो जीता वहीं सिकंदर' या सिनेमांसाठी फैजलने मंसूर खानसह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

कोणत्याही कलाकाराला काम मिळवणं, त्या मिळालेल्या संधीचे सोनं करणं आणि यश प्राप्त करणं ही काही सोपी बाब नाही. जे कलाकार हे करू शकतात ते अगदी सुपरस्टारपद मिळवतात. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांच्यावर अभिनय कारकिर्द सोडण्याची वेळ येते. हेच चंदेरी दुनियेचे खरे वास्तव आहे. ज्यांनी ही स्विकारले ते आज त्यांचे आयुष्या आनंदाने जगत आहेत. तर काही अभिनेते आज या झगमगत्या दुनियेपासून लांब जात स्वतःचा व्यवसाय सुरू करत त्यात  रमले आहेत. ग्लॅमर दुनियेपासून दुरावल्यामुळे काही अभिनेत्यांनी मात्र त्यांच्या लूकवर जास्त मेहनत घेतली नाही. परिणामी आज त्यांना ओळखणेही कठिण झाले आहे. 

 

असाच एक अभिनेता आता चर्चेत आला आहे.  फिल्मी दुनियेपासून दूर राहिल्यामुळे आता त्याचा लूकही खूप बदलला आहे. तो अभिनेता आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान. फैजलने ‘मेला’ सिनेमाद्वारे  सिनेसृष्टीत पदार्पण केले होते पण  त्या सिनेमाला हवे तसे यश मिळाले नाही. तसे हव्या तशा भूमिकाही फैजलला मिळाल्या नाही. आमिर सुपरस्टार भाऊ असतानाही फैजलचे नशीबाने मात्र त्याला काही साथ दिली नाही. तसेच फैजल सिनेष्टीत अपयशी ठरण्याला आमिर खान जबाबदार असल्याचे अनेकवेळा बोलले जाते. खरं काय आणि खोटं काय फारसे कोणाला माहिती नाही. मात्र तुमच्यात टॅलेंट असेल तर नक्कीच रसिकही तुम्हाला डोक्यावर घेतात त्यामुळे आमिरप्रमाणे अभिनयक्षमता फैजलमध्ये नसल्यामुळे रसिकांनीही त्याला स्विकारले नसावे. तुर्तास फैजल  चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्यानंतर त्याचा लूक खूप बदलला आहे.

 

आजही फैजलला आमिरचा भाऊ म्हणूनच ओळखले जाते. डिसेंबर २९मध्ये आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार फैजल मेला सिनेमानंतर पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र यावेळी तो अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून रसिकांच्या समोर येणार होता. फॅक्टरी या सिनेमातून तो दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार होता. अभिनेता म्हणून एंट्री करण्यापूर्वी फैजलने अनेक सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.  'कयामत से कयामत तक' आणि 'जो जीता वहीं सिकंदर' या सिनेमांसाठी फैजलने  मंसूर खानसह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

टॅग्स :आमिर खान